Posts

Showing posts from 2022

दत्त

Image
 दत्त निज ह्रिदयी जन्मले हो  दत्त निज ह्रिदयी जन्मले हो ।। श्वास घेता आत दत्त  ड़ोले मिटता पाही दत्त  देह भरी दत्त गजबजले हो  दत्त निज ह्रिदयी जन्मले हो ।। रोम रोमातूनी दत्त  स्पंदनात व्यापी दत्त  ह्रिदय मंदिर सजले हो  दत्त निज ह्रिदयी जन्मले हो ।। काही खाता खातों दत्त  काही पिता पितो दत्त  खाता पिता दत्तच भज़ले हो  दत्त निज ह्रिदयी जन्मले हो ।। शब्द ब्रह्म रूपी दत्त  अव्यक्ताचे भाव दत्त  दत्त पाहुनिया हसले हो  दत्त निज ह्रिदयी जन्मले हो ।। सगुनातूनि निर्गुण दत्त  आकारतुनी निराकार तो  सारे सारे दत्तच बनले हो  दत्त निज ह्रिदयी जन्मले हो ।। ❤️❤️❤️

दत्त

Image
 या ईथे आता दत्त  दत्त दत्त फक्त दत्त  समजावितो तो ही दत्त  ज्याला कले तो ही दत्त  आलेला क्षण असे दत्त  गेला तो ही सोडुन दत्त  या ईथे आता दत्त  दत्त दत्त फ़क्त दत्त  सांग कोठे नाही दत्त  जीथे तिथे असे दत्त  ज्याला समजे तो ही दत्त  नाही समजे तो ही दत्त  या ईथे आता दत्त  दत्त दत्त फक्त दत्त  भेटण्याची आस दत्त  भेटतसे तो ही दत्त  नाही जाण तो ही दत्त  जानिवेत असे दत्त  या ईथे आता दत्त  दत्त दत्त फ़क्त दत्त  जे जे दिसे ते ते दत्त  जे न दिसे ते ही दत्त  ऐकु येतो तोच दत्त  नाही काही असे दत्त  या ईथे आता दत्त  दत्त दत्त फ़क्त दत्त  स्पर्शुनिया गेला दत्त  स्पर्शतसे तो ही दत्त  दरवल जी असे दत्त  श्वास श्वास झाला दत्त  या ईथे आता दत्त  दत्त दत्त फक्त दत्त  मन फिरे तिथे दत्त  मन स्थिरे तिथे दत्त  मन खेले तिथे दत्त  मनोलय असे दत्त  या ईथे आता दत्त  दत्त दत्त फ़क्त दत्त  काम करे तो ही दत्त  आरामात असे दत्त  सुख दुःख निरवि दत्त  त्रिभुवनी फिरवि दत्त  या ईथे आता दत्त  दत्त दत्त फ़क्त दत्त  त्रिभुवनात वसे दत्त  दत्तात्रयी असे दत्त  एकरूपी आहे दत्त  सांग कोठे नाही दत्त  या ईथे आता दत्त  दत्त दत्त फ़क्त

अंतरंगी शिष्य… जनु काका

Image
🙏 🙏  ही एकरूपता  मनी साद येती  अलख म्हनोनि बाबा हांक देती  द्वारी उभे असे  काय सांगु रूप  बहरली काया  पाहता ते मुख  जाहलो मी धन्य  कृपेसी लाभलो आज हां सुदिन  भाग्यासी लाभलो ज्याची वाट सारे  ब्रह्मांड पाहति आज तोच द्वारी अशी ही महती काय वर्णु सुख  द्वारी ते ठाकले खून ओलख़ूनि देवाने राखले सूचेंना ते शब्द  शरीर कंपले होते नव्हते जे क्षणात संपले काय झाले तेव्हा कठिन सांगणे पूरे झाले सारे  जिवाचे मागणे उरले न क़ाही लाभली शून्यता  भाग्य हे उजेले जाहली धन्यता एकरूप झालो  दोन नाही क़ाही  मोजायला आज  उरले न क़ाही  शून्य आज तोही शून्य शून्य माझे शून्य सोडुनिया क़ाही नाही दुज़े व्हावे एकरूप  हाच एक धागा  पकडला तर  द्वारी तोच उभा  ❤️⚡️❤️🙏🙏

दत्त

Image
दत्त दत्त छंद असा  या मनाला जड़ला रे जड़ला हा जीव दत्त निर्गुनाच्या  प्रेमात पडला रे पडला दत्त दत्त निराकार तो  अंतरंगी दडला रे दडला दत्त दत्त नाद लाग़ूनी जीव हां घडला रे घडला दत्त दत्त नाम हे  मनी रुजले रे रूजले निराकार दत्त रूप हे  अवघे सजले रे सजले दत्त दत्त ईथेच मी आता जानीले रे जानीले दत्त दत्त करीत दत्ताने  दत्ताला आणीले रे आणिले दत्त दत्ताला दत्त बोलतो ईथे आता हो दत्त ड़ोलतो दत्त दत्त करता करता  दत्त अंतरी गुज ख़ोलतो दत्त ईथे अन दत्त तिथे रे  दत्त दाटला चहुदीशी दत्त या क्षणी दत्त त्या क्षणी दत्त दत्त हो अहर्निशी

साँदन वैली आणि परमेश्वराचा मार्ग …!

Image
 गुड मोर्निंग  आज सकालचा पेपर उघड़ून ठेवलाय😂 आसों, काही दिवसांपूर्वि साँदन वैली ला फिरायला गेलो होतो भंडारदर्याचा सुंदर निसर्ग, रतनगडाचा विस्तरालेला थाट, आणि बघता बघता आपण साँदन दरीच्या तोंडाशी…! दोन्ही बाज़उंनी ऊँचच ऊँच डोंगर कड़ा आणि मधुन दरिचि वाट..! दग़ड-धोंडे, छोटे चढ़ उतार, कधी गुडघ्या इतके तर कधी कंबरेइतके पाणी, काही ठिकानि छोटेसे तात्पुरते पुल आणि सोबत विविध रंगी विविध ढंगि सोबती, कुणी प्रचंड उत्साही तर कुणी आपल्याच धुन्दित तर कुणी थकलेला तर कुणी आता नको जावू वापस ….!  दरीचा अंत काही लागत नवता, मी आणि पीयूष गप्पा गोष्ठी करत चालत होतो. एव्हाना बरेच जन वापस फिरले होते आणि काही मोजकेच वेगवेगले संकल्प घेवुन दरीचे दूसरे टोक गाठत होते. कुणाल ते पूर्ण करुण दखवायाचे होते, कुणी ग्रुप सोबत लट्कुन बलज़बरिने संपवु पाहात होते, कुनाची स्वतः सोबत स्पर्धा होती तर क़ूनाला तिथे पोहचल्यावर जे नित्य नूतन आहे त्याचे सक्षिदार व्हायाचे होते. हलू हलू उजेड दीसू लागला, दरीचे दूसरे टोक ज़वल आले आणि मोजकेच तिथे पोहचलो होतो. आनंद होता . मज्जा होती . तेवध्यात आमचा गाइड बोलला “ खरे तर इथून पूढे उतरुन चालत च

शून्य

Image
 जय शंकर ❤️ जिस मैं को जी रहा तू  उसका कोई मोल नही  अनमोल जिसे तू कभी न समझे  उस शून्य का कोई तोल नही  अहम् से निर्मित इस झूट का  जब समझेगा सत्य तू  एक शून्य ही मिले राहगीर रह जाएगा अव्यक्त तू  अव्यक्तता की यह कहानी  शून्य से आरंभित है  व्यर्थ अहंम से निर्मित तेरी  बुद्धी यहाँ स्तंभित है  स्तंभित होना बुद्धी का यह  जागृति का संकेत हैं बुद्धी का होके भी न होना  यही सत्य अभिप्रेत है  ❤️❤️❤️ 😊😊😊 आजचा दिवस शून्याचा 😊 शून्य में शून्य समाये  शून्य जब शून्य से मिले  शून्य से शून्य घटाए तो  शून्य से शून्य ही खिले  ❤️❤️❤️ शून्य निराकार है  शून्य से ही आकार है  शून्य अपने आप में ही  शून्यका साक्षात्कार है शून्य भीतर  शून्य बाहर  शून्य ही समाविष्ट है  शून्य ब्रह्मांड से  शून्य कण कण से  शून्य ही विशिष्ट है शून्य की कोई सीमा नहीं शून्य अपरिमित है  चराचर सृष्टि में गर्भित  शून्य का ही गीत है शून्य से आरम्भ होता  शून्य में ही अंत है  कोलाहल नही है शून्य का  शून्य अतीव शांत है शून्य को समझने हेतु  शून्य होना चाहिये ग़र समझे शून्य को तो  शून्य को ही पायीए ❤️❤️❤️

Simple व्हावे वेड़े

Image
  सिम्पल  का रे वेड्या वागतोस तू  या शाहन्यापरी  वेड आहे ते वेडच जप तू  यत्ने नाना परी जगी शहाणा असतो बरं का  नित्यच भरलेला तू रिकामा बरा रिकामा नित्यच हरलेला हरवुन सारे अहं असे ते तू तर आनंदी  बघ तो शहाना कसा शोधतो नित्यच तो बंदी तू मुक्त रे नील्या आकाशी  घेतो भरारी बघ ती तिकडे हिर्मूसलेलि शहानि रे स्वारी तुझा असा हां वावर बघ रे छलतो की त्याला तोच बिचारा खिन्न होवुन विचारी मनाला का हां वेडा नित्यच हसतो मला का जमेना जमवून होतो  मी ही वेडा यात मी रमेना विचार येता मनी त्याक्षणी ज़त्रा ही भरली  वेड़े सारे एक़च झाले  रे चिंता सरलि एक वेडा त्या दिवशी मग  नाचला शाहन्यापरी  वेड़े म्हटले तू तर येथे आहेस राहन्यापरी होशिल वेडा तू पन येथे ठार वेड़े व्हावे ईथेच मस्तित वेड्यामध्ये निवांत तू रहावे आता  निवांत तू रहावे रात्रि वेडा नाचत राही  हो हाच नवा हां  म्हने किती वर्णु मी सुख हे  अहाहा अहाहा अहाहा  😂❤️😂 अहाहा अहाहा म्हनता म्हनता आकाशी तो उडाला  नित्य सूखाच्या डोहामध्ये पूरता तो बूडाला  सुखमय तो मग सुख़ात राहुन सूख हे देत राही  जो जो शहाना येता तिकडे वेडा होत राही  सुख स्वरूप तो सुख़ात राहुन  स

तुम ही हो

Image
 एहसास हो तुम मेरे  तुमही तो सहारा हो  इक हात तुम्हारा है  इक साथ तुम्हारा है  तुमही हो जीवन में  नैय्या और धारा हो  तुमही तो सागर हो  तुम ही तो किनारा हो  एक मैं भटका राही  तूम ही तो मंज़िल हो  मिट जायें अंधेरा ये  तुम ही ओ उजाला हो  तूम ही हो जीवन में  जीवन ही तुम्हारा है  कही  भूल न जाऊ मैं बस तू ही सहारा हो  इस पल और उस पल की  क्या बात सुनावू मैं जिस पल ने मुझे तुझसे  पलभर में मिलाया है  आँधी और तूफ़ाँने  यहाँ शोर मचाया था  इक तेरी झलक प्यारी  कहूँ कैसे  संभाला है  ❤️🙏❤️

कडु कारले

Image
 कडू कार्ल्याची भाजी  आज केली भाजी बघा  अहो कडू कारल्याची पाहूनच ज़ानिव झाली  बघा पोट भरल्याची जीभेंचे चोचले असे  अन त्याचा मी ग़ुलाम  परत ठरवले जिभेला घातली पाहिजे लगाम  एक घास घेतला तिथे  सूत्रधार रुसलाच होता  मन नाव त्याचे अन  त्याचा डाव फ़सला होता  चव घेता जिभेने मग  लगोलग प्रतिक्रिया दिली  चविस्ठ झालिय भाजी  अशी मनाने नोंद केली  आता मात्र सारेच ईथे  विचार करत बसले होते  कारल्याचे रूपांतरण हे  सार्यांच्या मनी ठसले होते  बोलता बोलता विषय हा माँड़ता माँड़ता लांबत गेला आयुष्याच्या कटु प्रसंगी काय करावे सांगत गेला कटु असे काहीच  नाही  हो  रूपांतरनाची कला रूजली आहे  स्वीकार, साक्ष आणि स्थिरतेने  अंतरी आत्मकला सजली आहे  ❤️🙏❤️

भक्तिसुधा नाम

Image
  जय शंकर  ❤️😊❤️ या भूताची सांगु  काय मी कथा  झपाटले मज  भूताने हो  हरवलि भूक लाग़ेना तहान एक एक क्षण भूताचा हो  सोडती ना मला  घड़ी भर भूत  असती सोबत दिस रात  बोलताहे जन झाला का रे येडा  काय सांगु आता  भूताचे हो  असेच रे भूत  नारदाचे पाठी  नाथांने ही असे  सांगीतले  ध्रुव बाल गोड़  हट्टाला पेटले लागुणिया नादी भूताचीया  किती सांगु तुला  भूताचे कथन  भले गेले वाटें भूताचिया सार्यांचे सांगने भूत एक सत्य  नका दूर लोटु भूताला या  याचा भार हवा  वाहन्यासी ईथे मुक्ति दावीनारे  भूत हेच  हात पकड़ुनी जायिल घेवुन देवाचिये द्वारी भूत हेच  करील रे उभा  तुला त्या क्षणात जीथे भेट होत  विट्ठलाची नामयाचा घास  सेविला देवाने नामयाच्या संगे भूत हेच  भूताचे प्रकार  नवविध आहे  भक्तिसुधा नाम  भूताचे या  भूताची रे वाट  भक्तिमार्ग नावे नाम हे साधन  भूताचे या  जो जो भारावतो इये भूताचेनी आत्मकलेमधी  विसावतो  😊❤️😊

द्वार देवाचिये

Image
 उभा राहन्यासी  गेलो त्याच्या द्वारी द्वार त्याचे मज  सापडेना सापडेना द्वार  आर्त झाला स्वर देवाचे ते द्वार  उघडेना उघडेना द्वार  धरोनिया धीर  घालोनिया साद आलविले  आलविले देवा  पानावले डोले  अश्रुँचा हां बांध तोड़ीयेला तोड़ियेला बांध विसरलो भान  माझे मी पन  हरवलो  हरवले माझे झाले सारे त्याचे क्षण क्षण क्षण  त्याचा झाला  आणि त्याच क्षणी उभा त्याच्या द्वारी घेतले कड़ेवरि शंकराने  ❤️❤️❤️

अंतरिच्या गुज गोष्ठी

Image
  विचारी किती जरी तू  हेच का अन तेच का? ग़च्च भरुनी मन ठेवले  तर राहिलच की पेच हा….! सोडवन्या हा पेच आता दे सोडूनी हे प्रश्न सारे बघ रिकाम्या बरनित या  सांग काय ते राहीले  तोच आज आणि उद्या काल सुद्धा तोच होता  तूच अडकुणी कुंपनात या  दूर त्यांसी ठेविले  तोड़ शृंखला या आता  मुक्त हो घे श्वास तू  श्वास हा त्याचाच आहे  का कधी तू जानिले  आनंदी आनंद आहे  आनंदी आनंद होता  तूच आनंदास या  का पांघरुनी ठेवले  आत बघ वा बाहेरी बघ आता ईथे तिथे व्यापले त्यानेच सारे  काही रिक्त न ठेविले  जो शंकर हृदयी तुझ्या तोच माझ्या अंतरी  शंकराने शंकरासी  आज रे खुनाविले शब्द नाही हे बोलले शब्द का कधी बोलती  अंतरिच्या मौनास बहुदा आज मी रे जाणिले आसवे ही टिपावि  अंतरिच्या अंतरी  काय बोलू काय सांगु भान मज ना राहिले

अंतरिचे महाराज

Image
उत्थान होई जिवाचे। कारण तेही असे सांचे। प्रकटतात अंतरिचे । शंकर महाराज ।। श्वास सारा एक होई। आत बाह्य काही नाही । व्यापतसे दिशा दाही। शंकर महाराज । भेदाभेद काही नाही । एकरूप सारे होई। अंतरातुन सारे पाही। शंकर महाराज । ही योजना त्यांचिच। हे प्रस्थान त्यांचेच। पोहचलो जीथे तेच । शंकर महाराज । येताना तू असे शंकर । जाशिल तेव्हा तूच  शंकर । म्हनती मधेच का हा विसर। शंकर महाराज । विसर कधी न पडु द्यावा। नित्य नेम आपला बरवा। म्हनती घडो नित्यसेवा। शंकर महाराज । 🙏🙏🙏  

देव बोलतो तेव्हा…!

 ❤️❤️❤️ जय शंकर  ❤️❤️❤️ जन्म दिला मीच रे  मोक्षाचे हे द्वार  आयुष्यरूपी अश्वावर  झाला बघ तू  स्वार मन दिले विचार दिले  विचार करण्याचि शक्ति  निरर्थक जे निर्मिले तू  त्यजून कर ना  भक्ति  डोले दिले निरखण्या जे जे सुंदर सूरूप  डोले मिटुन तपासवे अरे हे तर हरीरूप  जिह्वा दिली चाखण्या घेत रहावा रसास्वाद  बंध न होता  मुक्त असता करने न लगे उपास मुक्त होता मुक्त आहेस बंध निर्मिले कुणी क्ष गृहीत धरावा लागतो गणिताची पद्धत ज़ुनी भाव आणि भावना अडकत गेला कोली  बाहेर येन्याचा मार्ग मिलता ही अशी तुझी बोली  मजा तर मी करतच असतो सांग अडकला कोण ? ध्यान करोनि मजा लुटावि हा माझा दृष्टि कोण  मेजवानीचे ताट तू  कर ना रे फ़स्त ऊद्या नसेल अड़कु नकोस माहोल कर ना मस्त  मी कधिच मांडला नाही  हिशेब पाप पुण्याचा नष्ट वा निर्माण नाही माझा हिशेब शून्याचा  का पटवु साक्ष सांग मी ईथे तिथे जीथे  जावू दे ना मोक्ष ते व्हावे आधी रीते रीते  मी काही सांगीतले नाही  मी काही मागीतले नाही  तूच कर्ता झाला सारा  आता निस्तरन्याचि घाई  एकीकड़े म्हनतोस तू  जन्म दिला मी तुला  माझा जन्म मी दिला  कर्तेपना का तुला  कर्ते पना मला दे  कसले बंध

प्रवास

Image
सर्व प्रवासी बांधवांना नम्र निवेदन,  ख़ास आग्रहा तुन एक स्पेशल गाड़ी सुटत आहे,  *सगुण साकार ते निर्गुण निराकार* ही गाड़ी भक्ति, समर्पण, स्वीकारभाव , साक्षीभाव मार्गे निर्गुण निराकार स्टेशन पर्यंत जायिल. पूर्ण प्रवास बंधनकारक आहे, उगिच एखाद्या स्टेशन वर जास्त थांबन्याचा आग्रह करु नये, गाड़ी सूटली तर त्याच स्टेशनवर दीर्घ काल रहावे लागेल. # शिवोहम शिवोहम शिव स्वरूपोहम  नित्योहम शुद्होहम बुद्धोहम मुक्तोहम  शिव स्वरूपोहम  लहान असताना आपण एक मनी. दोन मनी, तीन मनी अशा दृश्य स्वरूपात एक दोन तीन असे मोजन्याचे तंत्र शिकतो नंतर उमजते मनी म्हंजे एक दोन तीन नव्हे , ते तर शिकन्यासाठी होते . जसे जसे आपले ज्ञान विकसित होत गेले तसा हा मन्यांच्या एका दोनाचा प्रवास पाढ़े, बेरिज, वजाबाकी, लसावि मसावि, गुणोत्तर प्रमाण , चलन , त्रिकोणमिति, इंटिगरेशन, डेरिवेशन असा किती दूर येवुन गेला, आणि गम्मत म्हंजे वेगवेगल्या रंगाचे एक दोन तीन शिकविनारे मनी कूठल्या कुठे विस्मृतित गेले, आठवलं की वाटते किती लहान होतो, आंगनवाड़ी बालवाडित होतो. आपण जर आंगनवाड़ी बालवाडित *मन रमते* म्हनून तिथेच रमलो असतो तर गणिताचे पुढ़िल मापदं

व्याकुल मन ..!

Image
परमेश्वरच्या अखंड प्रीति च्या बरसातीत चिम्ब भिजु पाहनारं व्याकुल मन…! अखंड कृपेचा वर्षाव होत असतना तृप्त होवु पाहनारं तहानलेलं मन …! अखंड आनंद घन बरसत असताना त्याला सम्पूर्ण अनुभवन्याच्या तय्यारित असलेलं आशाललेलं मन…! ह्या अवस्थेला पोहचलेलं मन देखिल ध्यान सरावनं पुष्ट झालेल्या जिवाचं…! किती छान …! उड़ानटप्पू मन व्याकुल झालय…! किती छान..! भिरभिरनारं मन स्थिर होवु पाहतयं..! किती छान…! त्याच्या व्याकुलतेला प्रामाणिक असल्याचि पावती अश्रुँनी दिलीच आहे , लबाड मनाचा सच्चेपना… किती छान ..! ही  व्याकुलता, ही तहान  ही भूक  ह्या चित्रात प्रकर्शाने जानवते…! आणि त्याला क्षणात संपवनारी ही सारी ओढ़ कोणत्या पाशाने अड़कलि आहे, कूठल्या दोरीने बांधुन ठेवलिय..! हा पाश मनाच्या चंचलतेचा..! हा पाश मनाच्या अनंत प्रलोभनांचा…! हा पाश मनाच्या प्रचंड महत्वकांक्षेचा …! हा पाश त्याच्या अस्थिरतेचा …! हा पाश एका लांबलचक यादिचा…! आणि या सगल्यांना सोबत घेवुनही…आज ते व्याकुल झालय…!तहानलय..!  ध्यानाच्या नित्य सरावाने आणि अंतरिच्या मालकाच्या  उपस्थितिचि सदैव ज़ानिवेत राहुन… आज ते व्याकुलय, तहानलय ..! हे बंधने तूटतिल….तूटन

आई ..!

Image
 गुरु माऊलिस जेव्हा कुणी माऊलि सांगतो एक आई जगी मोठी हाच अर्थ उमगतो काय उपमा ही द्यावि  जग चालकासी ईथे एक आई आणि आई  फ़क्त आईच शोभते  सांग देव काय आहे  म्हने विश्वाची जननी  देव शब्दात सांगन्या  येते आई च धावुनी आई देवाचे रे रूप  देव आईचे स्वरूप  गुरु आई आई गुरु  सारे सारे एकरूप  🙏🙏🙏 जय शंकर 🥰माऊलि🥰

खजिना…!

Image
 मन लावुनी करावे  आपापले नित्य कर्म कर्म साधन्याचे ईथे आहे एकचि रे वर्म  याचे त्याचे काय चाले  नको जीवा पाहु ईथे जो तो करी त्याचे कर्म नको ओझे वाहू ईथे उगा सवय रे तुझी ईथे तिथे डोकावतो देतो सोडोनी स्वताचे तूच तुला सतावतो तुझे झाले होते काम  खजिना रे भेटनार  दिले सोडोनी मधेच काय आता वाटनार गेला याच्या त्याच्या मागे तू रे फिरत राहिला तुझ्या अंतरिचा पाट बघ रिताच वाहीला 🥰🙏🥰

वाट..!

Image
वाट ..! देव शोधतो शोधतो देव शोधत राहतो अंतरिचा मालक रे  बघ हसुन पाहतो म्हने वाट दावी मज मला जाने त्याच्या गावा सांग तुझा कोण गाव  आधि बोध त्याचा व्हावा कोण ग़ावाहूनि आला  जावे कोण्या गावा वाटे सांग वेड्या आज तुला  कोण कोण ईथे भेटे जो जो भेटला भेटला तूज़ दूजाच भासला तुझी त्याची नाही भेट अंतरात जो बसला तू रे शोधत फ़िरतो कधी आत ही पहावे अंतरीचा मालक रे  त्याच्या सवे ही रहावे आता सापडलि वाट  नाही हरवली कधी  तूच ध्यान नाही दिले गोष्ठ होती किती साधी  तुला नको कधी साधे तुला लागे झगमग  तुला नको सहज रे  तुझी सारी तगमग तुला नको रे रिकामे तुझे सारे भरलेले टाक सांडुनिया आता  काय आता उरले रे  तोच उरला उरला  तिन्ही लोकि ज्याचा शोध  तोच होता आणि आहे  अंतरिचा हाच बोध  जय शंकर 🥰🙏🥰

देह सोन्याचा..!

देह सोनियाचि कुडी  नको समजू रे साधी  कर भक्ति घे रे नाम  कर आता कर घाई  ज्याला लोह समजुनी दिली वागणुक तशी अरे सोनियाचि काया सांग भरपाई कशी  गेली वेल ती जाऊ दे  आता पस्तावा कशाला  तूच आहे जलाशय  तरी कोरड घशाला आधि ओलख स्वतःला आहे किती अनमोल देह तुझा चन्दनाचा  सांग किती बहुमोल देह तुझा नाही साधा  आहे देवाचे मंदिर  गुरु माऊलिची साथ  आहे जीवन सुंदर  🥰🥰🥰 

समतोल

Image
 जीव शांत शांत उभा  लक्ष मनाकड़े नाही  मना चाले नित्य खोड्या जीव समतोल पाही  फली संसार रे बाबा  आहे कसरत थोड़ी  मन सदा कदा ईथे करतसे कुरघोडी लाथ मारूनिया जीवा  ईथे दोघही पड़ती तव्हा हेच मन वेडे पश्चातापाने रड़ती मन लेकरु लहान लक्ष द्यावेच लागते नाही दिले ध्यान जर बंडखोरी ने वाग़ते बघ आता त्याचे बंड  घाली लाथ तुझि तुला  सारा डाव उलथुनी सांग तोही कुठे गेला पाठ फिरव तू आता  बघ त्याच्या क़शा ऊड्या घ्यावे गोंज़ारून  त्यासी कमी होतिल रे खोड्या लाव सवय मनाला थोड़े तुझेही  ऐकेल फ़ेक अमुक म्हनता मन बघ रे फेकेल आता दोघे दोस्त झाले  आता दोघे फलिवर मन शांत शांत उभे आता नाही ख़ाली वर समतोल हा साधन्या दोन्ही एकरूप व्हावे माय शंकर माउली सवे तुझ्या नित्य धावे  🙏🙏🙏 जय शंकर

आरसा…!

Image
भेदाभेद झाला  तुझा रे स्वभाव  एकरूपतेचा  आहे ना अभाव  अहंकार तुझा तुला नागवितो  फुकाच्या गुर्मित तुला वागवितो काहीही करने  माझे मीच केले  तुच्छतेने सार्या जगा समजने  वाजवितो सदा  डंका सार्या जगा  मी माझे मीच अहंक़ारी बाधा धरावा आरसा ईथे प्रत्येकाने  ईथे तिथे जीथे तुझेच दीसने नाही राजा कुणी नाही कुणी रंक  हिशेब माँड़ता सदाही निरंक  नाही कुणी दाता  नाही हो भिखारी  मालक अंतरी  त्याचि रे चाकरी करावे नेमाने व्हावे एकरूप  आहेच आइना  दाखवि स्वरूप  🙏🙏🙏 जय शंकर ❤️❤️❤️

अंतरीच्या शक्यतांना ….!

Image
प्रश्नांचा मांडूनी पसारा खिन्न होऊनि तू बसतो उत्तरे ही साथ असता दुर्लक्षुनीया तू रुसतो वाटते मला आता हे  रुसणे अंतरी तू जोडले जे होते तुझे खरे रे  ते हसनेच तू रे सोडले सांग का कोड़े पडावे सांग का प्रश्नावली  उत्तरे ही साथ आहे  साथ शंकर माउली प्रश्न आणि उत्तरांचे द्वंद्व सारे हे मीटावे अंतरी जे साठलेले  तुझेच तुला रे भेटावे  भेट ही आहे अशी रे  वेड़ावुणी जाशिल तू  पाहुनी त्या खजीन्यासी  सांग काय होशिल तू  अमाप शक्यतांचा आहे  महासागर तूच रे  तुच्छ प्रश्न दे फेंकूनी तुझे उत्तर हेच रे  जय शंकर 🙏🙏🙏

अंतरिचे महाराज 🙏

 उत्थान होई जिवाचे। कारण तेही असे सांचे। प्रकटतात अंतरिचे । शंकर महाराज ।। श्वास सारा एक होई। आत बाह्य काही नाही । व्यापतसे दिशा दाही। शंकर महाराज । भेदाभेद काही नाही । एकरूप सारे होई। अंतरातुन सारे पाही। शंकर महाराज । ही योजना त्यांचिच। हे प्रस्थान त्यांचेच। पोहचलो जीथे तेच । शंकर महाराज । येताना तू असे शंकर । जाशिल तेव्हा तूच  शंकर । म्हनती मधेच का हा विसर। शंकर महाराज । विसर कधी न पडु द्यावा। नित्य नेम आपला बरवा। म्हनती घडो नित्यसेवा। शंकर महाराज । 🙏🙏🙏

अंतरिच्या मालकांसि…!

 विचारी किती जरी तू  हेच का अन तेच का? ग़च्च भरुनी मन ठेवले  तर राहिलच की पेच हा….!🥰 सोडवन्या हा पेच आता दे सोडूनी हे प्रश्न सारे बघ रिकाम्या बरनित या  सांग काय ते राहीले 🥰🥰🥰 तोच आज आणि उद्या काल सुद्धा तोच होता  तूच अडकुणी कुंपनात या  दूर त्यांसी ठेविले 🥰 तोड़ शृंखला या आता  मुक्त हो घे श्वास तू  श्वास हा त्याचाच आहे  का कधी तू जानिले 🥰 आनंदी आनंद आहे  आनंदी आनंद होता  तूच आनंदास या  का पांघरुनी ठेवले 🥰 आत बघ वा बाहेरी बघ आता ईथे तिथे व्यापले त्यानेच सारे  काही रिक्त न ठेविले 🥰 जो शंकर हृदयी तुझ्या तोच माझ्या अंतरी  शंकराने शंकरासी  आज रे खुनाविले🥰🥰🥰 आसवे ही टिपावि  अंतरिच्या अंतरी  काय बोलू काय सांगु भान मज ना राहिले🥰 शब्द नाही हे बोलले शब्द का कधी बोलती  अंतरिच्या मौनास बहुदा आज मी रे जाणिले🥰