Simple व्हावे वेड़े


 

सिम्पल 



का रे वेड्या वागतोस तू 

या शाहन्यापरी 

वेड आहे ते वेडच जप तू 

यत्ने नाना परी


जगी शहाणा असतो बरं का 

नित्यच भरलेला

तू रिकामा बरा रिकामा

नित्यच हरलेला


हरवुन सारे अहं असे ते

तू तर आनंदी 

बघ तो शहाना कसा शोधतो

नित्यच तो बंदी



तू मुक्त रे नील्या आकाशी 

घेतो भरारी

बघ ती तिकडे हिर्मूसलेलि

शहानि रे स्वारी


तुझा असा हां वावर बघ रे

छलतो की त्याला

तोच बिचारा खिन्न होवुन

विचारी मनाला


का हां वेडा नित्यच हसतो

मला का जमेना

जमवून होतो  मी ही वेडा

यात मी रमेना


विचार येता मनी त्याक्षणी

ज़त्रा ही भरली 

वेड़े सारे एक़च झाले 

रे चिंता सरलि


एक वेडा त्या दिवशी मग 

नाचला शाहन्यापरी 

वेड़े म्हटले तू तर येथे

आहेस राहन्यापरी


होशिल वेडा तू पन येथे

ठार वेड़े व्हावे

ईथेच मस्तित वेड्यामध्ये

निवांत तू रहावे

आता 

निवांत तू रहावे



रात्रि वेडा नाचत राही 

हो हाच नवा हां 

म्हने किती वर्णु मी सुख हे 

अहाहा अहाहा अहाहा 

😂❤️😂


अहाहा अहाहा म्हनता म्हनता

आकाशी तो उडाला 

नित्य सूखाच्या डोहामध्ये

पूरता तो बूडाला 


सुखमय तो मग सुख़ात राहुन

सूख हे देत राही 

जो जो शहाना येता तिकडे

वेडा होत राही 


सुख स्वरूप तो सुख़ात राहुन 

सुखाला बोलतसे

सुखमय करोनि जो जो भेंटे

सुख़ात डोलतसे

❤️❤️❤️


Comments

Popular posts from this blog

दत्त

शून्य

तू माझा सांगाती । काय वर्णु तुझे....!