साँदन वैली आणि परमेश्वराचा मार्ग …!


 गुड मोर्निंग 

आज सकालचा पेपर उघड़ून ठेवलाय😂

आसों,

काही दिवसांपूर्वि साँदन वैली ला फिरायला गेलो होतो

भंडारदर्याचा सुंदर निसर्ग, रतनगडाचा विस्तरालेला थाट, आणि बघता बघता आपण साँदन दरीच्या तोंडाशी…!

दोन्ही बाज़उंनी ऊँचच ऊँच डोंगर कड़ा आणि मधुन दरिचि वाट..! दग़ड-धोंडे, छोटे चढ़ उतार, कधी गुडघ्या इतके तर कधी कंबरेइतके पाणी, काही ठिकानि छोटेसे तात्पुरते पुल आणि सोबत विविध रंगी विविध ढंगि सोबती, कुणी प्रचंड उत्साही तर कुणी आपल्याच धुन्दित तर कुणी थकलेला तर कुणी आता नको जावू वापस ….! 

दरीचा अंत काही लागत नवता, मी आणि पीयूष गप्पा गोष्ठी करत चालत होतो.

एव्हाना बरेच जन वापस फिरले होते आणि काही मोजकेच वेगवेगले संकल्प घेवुन दरीचे दूसरे टोक गाठत होते. कुणाल ते पूर्ण करुण दखवायाचे होते, कुणी ग्रुप सोबत लट्कुन बलज़बरिने संपवु पाहात होते, कुनाची स्वतः सोबत स्पर्धा होती तर क़ूनाला तिथे पोहचल्यावर जे नित्य नूतन आहे त्याचे सक्षिदार व्हायाचे होते.

हलू हलू उजेड दीसू लागला, दरीचे दूसरे टोक ज़वल आले आणि मोजकेच तिथे पोहचलो होतो. आनंद होता . मज्जा होती .

तेवध्यात आमचा गाइड बोलला “ खरे तर इथून पूढे उतरुन चालत चालत पुनः दूसरया पयवाटेने पठारावर यायचे असते. ती खरी साँदन वैली ट्रेक 😂😂😂.

Comments

Popular posts from this blog

दत्त

शून्य

तू माझा सांगाती । काय वर्णु तुझे....!