Posts

Showing posts from December, 2021

माहुत....!!!

Image
  मन हत्ती होय बाबा त्यात लई रे ताक़त डाव उलथुणी टाकी मन एका रे क्षणात ध्यान नित्य अभ्यासाने मन राही रे काबूत त्याले ठेवण्या मूठित जीवा व्हावे रे माहुत कसा माहुत सहज हत्तिले रे बसवितो मन शांत शांत खोल सदा कदा हसवितो आज उधलला हत्ती आज जीव घाबरला मनाच्या या गुन्तित रे जीव हरला हरला व्हावे लागतें माहुत मन हत्ती होतों शांत गुरु माउलीचा हात त्याले तुझि असो साथ