कडु कारले


 कडू कार्ल्याची भाजी 



आज केली भाजी बघा 

अहो कडू कारल्याची

पाहूनच ज़ानिव झाली 

बघा पोट भरल्याची


जीभेंचे चोचले असे 

अन त्याचा मी ग़ुलाम 

परत ठरवले जिभेला

घातली पाहिजे लगाम 


एक घास घेतला तिथे 

सूत्रधार रुसलाच होता 

मन नाव त्याचे अन 

त्याचा डाव फ़सला होता 


चव घेता जिभेने मग 

लगोलग प्रतिक्रिया दिली 

चविस्ठ झालिय भाजी 

अशी मनाने नोंद केली 


आता मात्र सारेच ईथे 

विचार करत बसले होते 

कारल्याचे रूपांतरण हे 

सार्यांच्या मनी ठसले होते 


बोलता बोलता विषय हा

माँड़ता माँड़ता लांबत गेला

आयुष्याच्या कटु प्रसंगी

काय करावे सांगत गेला


कटु असे काहीच  नाही  हो 

रूपांतरनाची कला रूजली आहे 

स्वीकार, साक्ष आणि स्थिरतेने 

अंतरी आत्मकला सजली आहे 

❤️🙏❤️

Comments

Popular posts from this blog

दत्त

शून्य

तू माझा सांगाती । काय वर्णु तुझे....!