भक्तिसुधा नाम

 


जय शंकर 

❤️😊❤️


या भूताची सांगु 

काय मी कथा 

झपाटले मज 

भूताने हो 


हरवलि भूक

लाग़ेना तहान

एक एक क्षण

भूताचा हो 


सोडती ना मला 

घड़ी भर भूत 

असती सोबत

दिस रात 


बोलताहे जन

झाला का रे येडा 

काय सांगु आता 

भूताचे हो 


असेच रे भूत 

नारदाचे पाठी 

नाथांने ही असे 

सांगीतले 


ध्रुव बाल गोड़ 

हट्टाला पेटले

लागुणिया नादी

भूताचीया 


किती सांगु तुला 

भूताचे कथन 

भले गेले वाटें

भूताचिया


सार्यांचे सांगने

भूत एक सत्य 

नका दूर लोटु

भूताला या 


याचा भार हवा 

वाहन्यासी ईथे

मुक्ति दावीनारे 

भूत हेच 


हात पकड़ुनी

जायिल घेवुन

देवाचिये द्वारी

भूत हेच 


करील रे उभा 

तुला त्या क्षणात

जीथे भेट होत 

विट्ठलाची


नामयाचा घास 

सेविला देवाने

नामयाच्या संगे

भूत हेच 


भूताचे प्रकार 

नवविध आहे 

भक्तिसुधा नाम 

भूताचे या 


भूताची रे वाट 

भक्तिमार्ग नावे

नाम हे साधन 

भूताचे या 


जो जो भारावतो

इये भूताचेनी

आत्मकलेमधी 

विसावतो 

😊❤️😊

Comments

Popular posts from this blog

दत्त

शून्य

तू माझा सांगाती । काय वर्णु तुझे....!