अंतरीच्या शक्यतांना ….!


प्रश्नांचा मांडूनी पसारा

खिन्न होऊनि तू बसतो

उत्तरे ही साथ असता

दुर्लक्षुनीया तू रुसतो


वाटते मला आता हे 

रुसणे अंतरी तू जोडले

जे होते तुझे खरे रे 

ते हसनेच तू रे सोडले


सांग का कोड़े पडावे

सांग का प्रश्नावली 

उत्तरे ही साथ आहे 

साथ शंकर माउली


प्रश्न आणि उत्तरांचे

द्वंद्व सारे हे मीटावे

अंतरी जे साठलेले 

तुझेच तुला रे भेटावे 


भेट ही आहे अशी रे 

वेड़ावुणी जाशिल तू 

पाहुनी त्या खजीन्यासी 

सांग काय होशिल तू 


अमाप शक्यतांचा आहे 

महासागर तूच रे 

तुच्छ प्रश्न दे फेंकूनी

तुझे उत्तर हेच रे 




जय शंकर 🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

दत्त

शून्य

तू माझा सांगाती । काय वर्णु तुझे....!