दत्त


दत्त दत्त छंद असा 

या मनाला जड़ला रे जड़ला

हा जीव दत्त निर्गुनाच्या 

प्रेमात पडला रे पडला


दत्त दत्त निराकार तो 

अंतरंगी दडला रे दडला

दत्त दत्त नाद लाग़ूनी

जीव हां घडला रे घडला


दत्त दत्त नाम हे 

मनी रुजले रे रूजले

निराकार दत्त रूप हे 

अवघे सजले रे सजले


दत्त दत्त ईथेच मी

आता जानीले रे जानीले

दत्त दत्त करीत दत्ताने 

दत्ताला आणीले रे आणिले


दत्त दत्ताला दत्त बोलतो

ईथे आता हो दत्त ड़ोलतो

दत्त दत्त करता करता 

दत्त अंतरी गुज ख़ोलतो


दत्त ईथे अन दत्त तिथे रे 

दत्त दाटला चहुदीशी

दत्त या क्षणी दत्त त्या क्षणी

दत्त दत्त हो अहर्निशी

Comments

Popular posts from this blog

दत्त

शून्य

तू माझा सांगाती । काय वर्णु तुझे....!