Posts

Showing posts from September, 2022

द्वार देवाचिये

Image
 उभा राहन्यासी  गेलो त्याच्या द्वारी द्वार त्याचे मज  सापडेना सापडेना द्वार  आर्त झाला स्वर देवाचे ते द्वार  उघडेना उघडेना द्वार  धरोनिया धीर  घालोनिया साद आलविले  आलविले देवा  पानावले डोले  अश्रुँचा हां बांध तोड़ीयेला तोड़ियेला बांध विसरलो भान  माझे मी पन  हरवलो  हरवले माझे झाले सारे त्याचे क्षण क्षण क्षण  त्याचा झाला  आणि त्याच क्षणी उभा त्याच्या द्वारी घेतले कड़ेवरि शंकराने  ❤️❤️❤️

अंतरिच्या गुज गोष्ठी

Image
  विचारी किती जरी तू  हेच का अन तेच का? ग़च्च भरुनी मन ठेवले  तर राहिलच की पेच हा….! सोडवन्या हा पेच आता दे सोडूनी हे प्रश्न सारे बघ रिकाम्या बरनित या  सांग काय ते राहीले  तोच आज आणि उद्या काल सुद्धा तोच होता  तूच अडकुणी कुंपनात या  दूर त्यांसी ठेविले  तोड़ शृंखला या आता  मुक्त हो घे श्वास तू  श्वास हा त्याचाच आहे  का कधी तू जानिले  आनंदी आनंद आहे  आनंदी आनंद होता  तूच आनंदास या  का पांघरुनी ठेवले  आत बघ वा बाहेरी बघ आता ईथे तिथे व्यापले त्यानेच सारे  काही रिक्त न ठेविले  जो शंकर हृदयी तुझ्या तोच माझ्या अंतरी  शंकराने शंकरासी  आज रे खुनाविले शब्द नाही हे बोलले शब्द का कधी बोलती  अंतरिच्या मौनास बहुदा आज मी रे जाणिले आसवे ही टिपावि  अंतरिच्या अंतरी  काय बोलू काय सांगु भान मज ना राहिले

अंतरिचे महाराज

Image
उत्थान होई जिवाचे। कारण तेही असे सांचे। प्रकटतात अंतरिचे । शंकर महाराज ।। श्वास सारा एक होई। आत बाह्य काही नाही । व्यापतसे दिशा दाही। शंकर महाराज । भेदाभेद काही नाही । एकरूप सारे होई। अंतरातुन सारे पाही। शंकर महाराज । ही योजना त्यांचिच। हे प्रस्थान त्यांचेच। पोहचलो जीथे तेच । शंकर महाराज । येताना तू असे शंकर । जाशिल तेव्हा तूच  शंकर । म्हनती मधेच का हा विसर। शंकर महाराज । विसर कधी न पडु द्यावा। नित्य नेम आपला बरवा। म्हनती घडो नित्यसेवा। शंकर महाराज । 🙏🙏🙏  

देव बोलतो तेव्हा…!

 ❤️❤️❤️ जय शंकर  ❤️❤️❤️ जन्म दिला मीच रे  मोक्षाचे हे द्वार  आयुष्यरूपी अश्वावर  झाला बघ तू  स्वार मन दिले विचार दिले  विचार करण्याचि शक्ति  निरर्थक जे निर्मिले तू  त्यजून कर ना  भक्ति  डोले दिले निरखण्या जे जे सुंदर सूरूप  डोले मिटुन तपासवे अरे हे तर हरीरूप  जिह्वा दिली चाखण्या घेत रहावा रसास्वाद  बंध न होता  मुक्त असता करने न लगे उपास मुक्त होता मुक्त आहेस बंध निर्मिले कुणी क्ष गृहीत धरावा लागतो गणिताची पद्धत ज़ुनी भाव आणि भावना अडकत गेला कोली  बाहेर येन्याचा मार्ग मिलता ही अशी तुझी बोली  मजा तर मी करतच असतो सांग अडकला कोण ? ध्यान करोनि मजा लुटावि हा माझा दृष्टि कोण  मेजवानीचे ताट तू  कर ना रे फ़स्त ऊद्या नसेल अड़कु नकोस माहोल कर ना मस्त  मी कधिच मांडला नाही  हिशेब पाप पुण्याचा नष्ट वा निर्माण नाही माझा हिशेब शून्याचा  का पटवु साक्ष सांग मी ईथे तिथे जीथे  जावू दे ना मोक्ष ते व्हावे आधी रीते रीते  मी काही सांगीतले नाही  मी काही मागीतले नाही  तूच कर्ता झाला सारा  आता निस्तरन्याचि घाई  एकीकड़े म्हनतोस तू  जन्म दिला मी तुला  माझा जन्म मी दिला  कर्तेपना का तुला  कर्ते पना मला दे  कसले बंध