अंतरिच्या गुज गोष्ठी

 

विचारी किती जरी तू 

हेच का अन तेच का?

ग़च्च भरुनी मन ठेवले 

तर राहिलच की पेच हा….!


सोडवन्या हा पेच आता

दे सोडूनी हे प्रश्न सारे

बघ रिकाम्या बरनित या 

सांग काय ते राहीले 


तोच आज आणि उद्या

काल सुद्धा तोच होता 

तूच अडकुणी कुंपनात या 

दूर त्यांसी ठेविले 


तोड़ शृंखला या आता 

मुक्त हो घे श्वास तू 

श्वास हा त्याचाच आहे 

का कधी तू जानिले 


आनंदी आनंद आहे 

आनंदी आनंद होता 

तूच आनंदास या 

का पांघरुनी ठेवले 


आत बघ वा बाहेरी

बघ आता ईथे तिथे

व्यापले त्यानेच सारे 

काही रिक्त न ठेविले 


जो शंकर हृदयी तुझ्या

तोच माझ्या अंतरी 

शंकराने शंकरासी 

आज रे खुनाविले


शब्द नाही हे बोलले

शब्द का कधी बोलती 

अंतरिच्या मौनास बहुदा

आज मी रे जाणिले


आसवे ही टिपावि 

अंतरिच्या अंतरी 

काय बोलू काय सांगु

भान मज ना राहिले


Comments

Popular posts from this blog

दत्त

शून्य

तू माझा सांगाती । काय वर्णु तुझे....!