अंतरंगी शिष्य… जनु काका

🙏


🙏

 ही एकरूपता 

मनी साद येती 

अलख म्हनोनि

बाबा हांक देती 


द्वारी उभे असे 

काय सांगु रूप 

बहरली काया 

पाहता ते मुख 


जाहलो मी धन्य 

कृपेसी लाभलो

आज हां सुदिन 

भाग्यासी लाभलो


ज्याची वाट सारे 

ब्रह्मांड पाहति

आज तोच द्वारी

अशी ही महती


काय वर्णु सुख 

द्वारी ते ठाकले

खून ओलख़ूनि

देवाने राखले


सूचेंना ते शब्द 

शरीर कंपले

होते नव्हते जे

क्षणात संपले


काय झाले तेव्हा

कठिन सांगणे

पूरे झाले सारे 

जिवाचे मागणे


उरले न क़ाही

लाभली शून्यता 

भाग्य हे उजेले

जाहली धन्यता


एकरूप झालो 

दोन नाही क़ाही 

मोजायला आज 

उरले न क़ाही 


शून्य आज तोही

शून्य शून्य माझे

शून्य सोडुनिया

क़ाही नाही दुज़े


व्हावे एकरूप 

हाच एक धागा 

पकडला तर 

द्वारी तोच उभा 


❤️⚡️❤️🙏🙏

Comments

Popular posts from this blog

दत्त

शून्य

तू माझा सांगाती । काय वर्णु तुझे....!