अंतरिच्या मालकांसि…!
विचारी किती जरी तू
हेच का अन तेच का?
ग़च्च भरुनी मन ठेवले
तर राहिलच की पेच हा….!🥰
सोडवन्या हा पेच आता
दे सोडूनी हे प्रश्न सारे
बघ रिकाम्या बरनित या
सांग काय ते राहीले 🥰🥰🥰
तोच आज आणि उद्या
काल सुद्धा तोच होता
तूच अडकुणी कुंपनात या
दूर त्यांसी ठेविले 🥰
तोड़ शृंखला या आता
मुक्त हो घे श्वास तू
श्वास हा त्याचाच आहे
का कधी तू जानिले 🥰
आनंदी आनंद आहे
आनंदी आनंद होता
तूच आनंदास या
का पांघरुनी ठेवले 🥰
आत बघ वा बाहेरी
बघ आता ईथे तिथे
व्यापले त्यानेच सारे
काही रिक्त न ठेविले 🥰
जो शंकर हृदयी तुझ्या
तोच माझ्या अंतरी
शंकराने शंकरासी
आज रे खुनाविले🥰🥰🥰
आसवे ही टिपावि
अंतरिच्या अंतरी
काय बोलू काय सांगु
भान मज ना राहिले🥰
शब्द नाही हे बोलले
शब्द का कधी बोलती
अंतरिच्या मौनास बहुदा
आज मी रे जाणिले🥰
Comments