Posts

Showing posts from October, 2016

तरच...Happy Diwali...!

आली दिवाळी आली....! उटणे लावून शरीरं स्वच्छ झाली.....! नवे कोरे कपडे....शरीरं झाकली गेली..! दिवे पेटले..... आकाशकंदीलाचा प्रकाश पडला.....! फराळ झालं.....कुरकुरीत कधी गोड धोड.....! फटाक्याची आतिषबाजी....आवाज अन झगमगाट....! दिवाळी आलेली आहे....! तिच्या सगळ्या ठरवून ठेवलेल्या लक्षणांनी ती आली आहे हे लक्षात येतंय...! हो दिवाळी आलेली आहे...! पण, प्रेमाच्या सुगंधी उटण्यांनी मनं स्वच्छ झाली पाहिजे...! आणि प्रेमाचा सुगन्ध सर्वदूर पसरविणारे मनं तयार झाली पाहिजे....! नैतिकतेच्या नव्या कोऱ्या कपड्यांनी मनं झाकली गेली पाहिजे म्हणजे ते आणखी खुलेल आणि लाजही राहील.....! सजगतेचा आकाशकंदील आणि प्रामाणिकपणाचा दिवा मनांत पेटला पाहिजे....आणि स्वतःची चाललेली स्वार्थकेंद्री पैशाची हावरी धडपड लख्ख दिसली पाहिजे.....! तृप्तीचे फराळ मनाला मिळालं पाहिजे आणि जे आहे ते पुरेसं आहे ही जाणीव मनांत भरून उरायला हवी.....! जागृतीच्या फटाक्यांच्या आवाज आणि प्रकाशाने मन भानावर यायला पाहिजे आणि मनानं चालवलेली अंदाधुंद धडपड आता तरी थांबली पाहिजे....! आणि तर आणि तरच..... HAPPY DIWALI नसता.... सणासुदी

अंतरीचे महाराज..!

हे त्रिनेत्रधारी गौरीहरा शिवशंकरा तुझी लीला अपरंपार आहे. तु लीलाधारी लीला रचवितो, तू खेळिया आम्हांस खेळवितो, तुझी सत्ता या अवघ्या विश्वावर राज्य करते, तूच कर्ता आणि करविता, तूच या विश्वचैतन्यमयी सत्तेचे अधिष्ठान, तूच आहेस चैतन्यमयी उर्जेला आधार, हे सर्वेश्वरा तुला कोटी कोटी नमन. सद्गुरू शंकर महाराजांच्या लीला जेव्हा आपण साक्षी भावातून प्रकट करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या अनंत बोध करून देणाऱ्या ठरतात. सजगतेणे आणि सहज भावातून समजून घेत असताना अलगद फुलपाखरू हातावर येऊन बसावं असं काहीतरी मनोमनी प्रकट होऊ लागतं. महाराजांचे प्रेम अंतरातुनी वाहू लागते आणि मोहरून जाऊन मन मयूर अनंत रंगछटांचा मोर पिसारा फुलवून थुई थुई नाचू लागते.  ईश्वरीय अनुभूतीप्रति श्रद्धा आणि भक्तिच्या संगमातून जो विलक्षण प्रवाह वाहू लागतो त्यातुन आत्मा जणू असा रंगून जातो जसा कि इंद्रधनूच्या रंगाची बरसात आत्म्याच्या मंदिरी व्हावी.  ईश्वरीय चेतना अंग भर नाचू लागते अन विकारी दाह असे शांत होतात जणू काय त्यांना हिमालयाची शीतलता मिळावी. महाराजांच्या प्रेमाची नशा जशी जशी चढू लागते तशी तशी मन आणि त्यानं रचलेली मायेची भक

आई....दार उघड..!!!

हे जगन्माते आई..! दार उघड...! आई दार उघड..! समजून उमजून निपचित सोंग घेतलेलेल्या या माझ्यासकट अखिल समाजाला आई जागं कर....! डोक्यात मुरलेली विकारांचा विखारी दाह आई शांत कर...!! एकमेकांकडे बघण्याची स्वार्थी वृत्ती आई दूर कर....! मिळवण्याचा हव्यास आई कमी कर...! आई दार उघड...! आई दार उघड....! भरकटलोय आई जगण्याच्या अत्युच्च प्रेरनेपासून, दूर आलोय आई जन्माच्या शाश्वत उद्देशा पासून, विसर पडलाय आई तुझ्या विश्वचेतनेचा, तुझ्या अंतर्बाह्य व्यापून उरलेल्या चैतन्य स्वरूपाचा, तुझ्या सर्वांग सुंदर साकार रुपी निसर्ग अविष्काराचा, प्रेममयी भक्तीचा, ज्ञानमयी विद्येचे, वात्सल्यमयी ममतेचा, सामर्थ्यमयी शक्तीचा, प्रज्ञामयी बुद्धीचा, आई विसर पडलाय... जागरण होऊ दे....आई... जागृती येऊ दे... आई दार उघडू दे.. आता आई दार उघडु दे. अंधाराला तेज दे आई, प्रेमाला विश्वास दे, मानवतेला करुणा दे, चारित्र्याला शील दे, प्रेरणेला वेग दे, आई निपचित पडलेल्या या माझ्यासकट अखिल समाजाला जाग दे, विचारांना सत्प्रेरनेची साथ दे, आणि  आई, तुझ्या रूपाचे सत्यार्थ आविष्कृत