निब्बर मनाची गब्बर यंत्रणा...!
साधारण दहा साडे दहाच्या आसपास आम्ही तिथे पोहचलो. आम्ही पोहचन्यापूर्वी पंधरा वीस जन हॉल मधे बसलेले होते. त्यात चार पाच जनी होत्या आणि बाकीचे....! गेल्या पंधरा वीस दिवसांपासून हे सारे जन एकाच गोष्टिवर काम करत होते आणि आज त्यांच्या कामाची पाहणी करुन पुढील रूपरेषा सावनेरकर साहेब सांगणार होते. प्रत्येक जन सावनेरकर साहेबांची वाट पाहत सोबत आणलेल्या फ़ाइल मधे बघून अति विशेष अशा प्रकारात सहज बसेल अशी चर्चा करत होते. तशी हॉल मधे व्यवस्था छान होती...एयर कंडीशन मधे कोपऱ्यात कॉफी मेकर मशीन होती आणि प्रत्येकाच्या समोर मिनरल वाटरच्या बाटल्या पोज़ देत होत्या....! समोरच्या प्रोजेक्टर स्क्रीन वर लिहिलेलं मी वाचत होतो तितक्यात सावनेरकर साहेब आणि त्यांचे सहकारी असे एकूण चार जन आत आले. खुपच मोठा अर्थपूर्ण पॉज घेऊन साहेबांनी बोलायला सुरुवात केली,"आज आपण सर्व जन या ठिकाणी 'एकात्मिक कुपोषण निर्मुलन कार्यक्रम' अंतर्गत कुपोषणाची कारणे आणि उपाय या वर तुम्ही केलेल्या कामाची तपासणी करणार आहोत" एक एक करून साहेबांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सगळ्या फाइली तपासल्या आणि काही दुरुस्तीचे शेरे सु