Posts

Showing posts from 2023

तू माझा सांगाती । काय वर्णु तुझे....!

 1) तू माझा सांगाती । काय वर्णु तुझे ।। नाम तुझे घेता । जळे कर्म माझे ।। माझे ते संपोनी । तुझे ते उरु दे।। तूच कर्ता राहो । माझे ते मरू दे ।। तुला कळवळा । क्षणोक्षणी माझा ।। माझिया मनीचा । तूच शोभे राजा ।। नको आता काही । माझे तुझे देवा ।। हृदयी निरंतर । घडो तुझी सेवा ।। दत्त म्हणे आता । दत्त दत्त व्हावे ।। दत्त दत्त दत्त । दत्त ची असावे ।। 2)आज आत्ता ईथे दत्त । दत्त होऊनि निवांत ।। दत्त उभा असे सदा । ह्रिदय मंदिरी दत्त गाभा ।  दत्त वसे चराचरी । दत्त आपूल्या अंतरी ।। दत्त म्हने दत्त व्हावे । अवघ्या जगा सुखवावे।। ❤️❤️❤️ दत्त रूप ज़ानावे । दत्त दत्त होवुन जावे । नको काही छंद दूजा । ह्रिदयी मांडू दत्त पूजा । नको कुन्या गावा जावे । दत्त नगरी दंग व्हावे। कुठे आहे दत्त नगरी । बघुया चला ह्रिदय मंदिरी। दत्त म्हने दत्त भेंटो । अवघ्या जगा आनंद वाटों ।। दत्त बसले ध्यानाला । शांत केले मनाला । मन धावे ईथे तिथे । आत्ता दत्तच जीथे तिथे । दत्त लाग़ले संसारी । मन सम्पले व्यापारी । आता दुःख सुख नाही । मन एक दत्त पाही । दत्त म्हने निवांत रहा । करतो मी जे शांत पहा । दत्त होवूनिया ईथे । चला निज स्वरूपा पाहु