द्वार देवाचिये


 उभा राहन्यासी 

गेलो त्याच्या द्वारी

द्वार त्याचे मज 

सापडेना


सापडेना द्वार 

आर्त झाला स्वर

देवाचे ते द्वार 

उघडेना


उघडेना द्वार 

धरोनिया धीर 

घालोनिया साद

आलविले 


आलविले देवा 

पानावले डोले 

अश्रुँचा हां बांध

तोड़ीयेला


तोड़ियेला बांध

विसरलो भान 

माझे मी पन 

हरवलो 


हरवले माझे

झाले सारे त्याचे

क्षण क्षण क्षण 

त्याचा झाला 


आणि त्याच क्षणी

उभा त्याच्या द्वारी

घेतले कड़ेवरि

शंकराने 

❤️❤️❤️

Comments

Popular posts from this blog

दत्त

शून्य

तू माझा सांगाती । काय वर्णु तुझे....!