देव बोलतो तेव्हा…!

 ❤️❤️❤️

जय शंकर 

❤️❤️❤️


जन्म दिला मीच रे 

मोक्षाचे हे द्वार 

आयुष्यरूपी अश्वावर 

झाला बघ तू  स्वार


मन दिले विचार दिले 

विचार करण्याचि शक्ति 

निरर्थक जे निर्मिले तू 

त्यजून कर ना  भक्ति 


डोले दिले निरखण्या

जे जे सुंदर सूरूप 

डोले मिटुन तपासवे

अरे हे तर हरीरूप 


जिह्वा दिली चाखण्या

घेत रहावा रसास्वाद 

बंध न होता  मुक्त असता

करने न लगे उपास


मुक्त होता मुक्त आहेस

बंध निर्मिले कुणी

क्ष गृहीत धरावा लागतो

गणिताची पद्धत ज़ुनी


भाव आणि भावना

अडकत गेला कोली 

बाहेर येन्याचा मार्ग मिलता

ही अशी तुझी बोली 


मजा तर मी करतच असतो

सांग अडकला कोण ?

ध्यान करोनि मजा लुटावि

हा माझा दृष्टि कोण 


मेजवानीचे ताट तू 

कर ना रे फ़स्त

ऊद्या नसेल अड़कु नकोस

माहोल कर ना मस्त 


मी कधिच मांडला नाही 

हिशेब पाप पुण्याचा

नष्ट वा निर्माण नाही

माझा हिशेब शून्याचा 


का पटवु साक्ष सांग

मी ईथे तिथे जीथे 

जावू दे ना मोक्ष ते

व्हावे आधी रीते रीते 


मी काही सांगीतले नाही 

मी काही मागीतले नाही 

तूच कर्ता झाला सारा 

आता निस्तरन्याचि घाई 


एकीकड़े म्हनतोस तू 

जन्म दिला मी तुला 

माझा जन्म मी दिला 

कर्तेपना का तुला 


कर्ते पना मला दे 

कसले बंध क़सला गुंता

मुक्त आहेस मुक्त होशिल

सांग आता कशाची चिंता


एक तर सगले तू कर 

आणि तूझे निस्तारत जा 

नाही माझे होते मला दे 

माझ्यामधे विस्तारत जा 


थोडं माझं थोडं तुझं

दूटप्पीपना सोड आता 

द्वैत सोडुन अद्वैताशी

नाते तुझे जोड़ आता 


जोड़ताना अड़खललास

तर ध्याणाची कास धर

मी सांगतो म्हनून नाही 

तुझी अंतरी आस धर 


खाताना टम्म ख़ाल्ले

उपचार आता करतोय 

खायालाच का दिले

असे का विचारतोय 


गम्मत करतोय तुझी 

रूसु नको फ़ूगू नको

कर्ता भाव सोडुन दे 

व्यर्थ जीने जगु नको

❤️❤️❤️

Comments

Popular posts from this blog

दत्त

शून्य

तू माझा सांगाती । काय वर्णु तुझे....!