प्रवास




सर्व प्रवासी बांधवांना नम्र निवेदन, 
ख़ास आग्रहा तुन एक स्पेशल गाड़ी सुटत आहे, 

*सगुण साकार ते निर्गुण निराकार*

ही गाड़ी भक्ति, समर्पण, स्वीकारभाव , साक्षीभाव मार्गे निर्गुण निराकार स्टेशन पर्यंत जायिल.

पूर्ण प्रवास बंधनकारक आहे, उगिच एखाद्या स्टेशन वर जास्त थांबन्याचा आग्रह करु नये, गाड़ी सूटली तर त्याच स्टेशनवर दीर्घ काल रहावे लागेल.

#

शिवोहम शिवोहम
शिव स्वरूपोहम 
नित्योहम शुद्होहम बुद्धोहम मुक्तोहम 
शिव स्वरूपोहम 

लहान असताना आपण एक मनी. दोन मनी, तीन मनी अशा दृश्य स्वरूपात एक दोन तीन असे मोजन्याचे तंत्र शिकतो नंतर उमजते मनी म्हंजे एक दोन तीन नव्हे , ते तर शिकन्यासाठी होते . जसे जसे आपले ज्ञान विकसित होत गेले तसा हा मन्यांच्या एका दोनाचा प्रवास पाढ़े, बेरिज, वजाबाकी, लसावि मसावि, गुणोत्तर प्रमाण , चलन , त्रिकोणमिति, इंटिगरेशन, डेरिवेशन असा किती दूर येवुन गेला, आणि गम्मत म्हंजे वेगवेगल्या रंगाचे एक दोन तीन शिकविनारे मनी कूठल्या कुठे विस्मृतित गेले, आठवलं की वाटते किती लहान होतो,
आंगनवाड़ी बालवाडित होतो.

आपण जर आंगनवाड़ी बालवाडित *मन रमते* म्हनून तिथेच रमलो असतो तर गणिताचे पुढ़िल मापदंड कधी उमजले नसतेच.
मन रमवणे हा हेतु कधी नव्हताच आणि नसावा ही ….!

तुझको चलना होगा …!
तुझको चलना होगा …!

असावे ते नसावे …! प्रवास
धरुन ठेवावे ते फेकुन द्यावे…! प्रवास
जपावे ते मारावे…! प्रवास
शोधावे ते हरवुन जावे…! प्रवास

सर्व प्रवाशंना नम्र निवेदन, ख़ास आग्रह खातर स्पेशल गाड़ी सुटत आहे.

🙏🥰🙏

Comments

Popular posts from this blog

दत्त

शून्य

तू माझा सांगाती । काय वर्णु तुझे....!