आरसा…!


भेदाभेद झाला 
तुझा रे स्वभाव 
एकरूपतेचा 
आहे ना अभाव 

अहंकार तुझा
तुला नागवितो 
फुकाच्या गुर्मित
तुला वागवितो

काहीही करने 
माझे मीच केले 
तुच्छतेने सार्या
जगा समजने 

वाजवितो सदा 
डंका सार्या जगा 
मी माझे मीच
अहंक़ारी बाधा

धरावा आरसा
ईथे प्रत्येकाने 
ईथे तिथे जीथे
तुझेच दीसने

नाही राजा कुणी
नाही कुणी रंक 
हिशेब माँड़ता
सदाही निरंक 

नाही कुणी दाता 
नाही हो भिखारी 
मालक अंतरी 
त्याचि रे चाकरी

करावे नेमाने
व्हावे एकरूप 
आहेच आइना 
दाखवि स्वरूप 

🙏🙏🙏 जय शंकर ❤️❤️❤️


Comments

Popular posts from this blog

दत्त

शून्य

तू माझा सांगाती । काय वर्णु तुझे....!