Posts

Showing posts from 2019

चांगभलं

हे जगन्माते आई..! दार उघड...! आई दार उघड..! समजून उमजून निपचित सोंग घेतलेलेल्या या माझ्यासकट अखिल समाजाला आई जागं कर....! डोक्यात मुरलेली विकारांचा विखारी दाह आई शांत कर...!! एकमेकांकडे बघण्याची स्वार्थी वृत्ती आई दूर कर....! मिळवण्याचा हव्यास आई कमी कर...! आई दार उघड...! आई दार उघड....! भरकटलोय आई जगण्याच्या अत्युच्च प्रेरनेपासून, दूर आलोय आई जन्माच्या शाश्वत उद्देशा पासून, विसर पडलाय आई तुझ्या विश्वचेतनेचा, तुझ्या अंतर्बाह्य व्यापून उरलेल्या चैतन्य स्वरूपाचा, तुझ्या सर्वांग सुंदर साकार रुपी निसर्ग अविष्काराचा, प्रेममयी भक्तीचा, ज्ञानमयी विद्येचे, वात्सल्यमयी ममतेचा, सामर्थ्यमयी शक्तीचा, प्रज्ञामयी बुद्धीचा, आई विसर पडलाय... जागरण होऊ दे....आई... जागृती येऊ दे... आई दार उघडू दे.. आता आई दार उघडु दे. अंधाराला तेज दे आई, प्रेमाला विश्वास दे, मानवतेला करुणा दे, चारित्र्याला शील दे, प्रेरणेला वेग दे, आई निपचित पडलेल्या या माझ्यासकट अखिल समाजाला जाग दे, विचारांना सत्प्रेरनेची साथ दे, आणि  आई, तुझ्या रूपाचे सत्यार्थ आविष्कृत

विठ्ठल आवडी प्रेमभाव

Image
विठ्ठल आवडी प्रेमभाव आज आषाढ़ी एकादशी त्या निमित्त एकच विट्ठल आवडी प्रेमभाव आहे का तो विठ्ठलाला आवडणारा प्रेम भाव मनोमनी... ह्याच्या-त्याच्या -त्या तिकडच्याच्या आणि महत्वाचं म्हणजे माझ्या (तीन वेळा रिपीट ) माझ्या -माझ्या - माझ्या ) मनांत... आहे का प्रेम भाव सत्य हे आहे बंधू. की माझ्या मनांत कामापुरता प्रेमभाव वासनेच्या आधीन प्रेम भाव मतलबी प्रेमभाव मोहात अड्कलेला प्रेमभाव स्वार्थी एक्कलकोण्डी प्रेमभाव व्यवहारिक प्रेमभाव राजनैतिक प्रेमभाव कारस्थानी प्रेमभाव प्रॉपर्टीचा प्रेमभाव मोट्ठा अहंकारी प्रेमभाव टाइम पास वाला प्रेम भाव हातचा राखुन ठेवलेला प्रेमभाव भीति पोटी प्रेमभाव डुप्लीकेट मधे अस्सल डुप्लीकेट प्रेमभाव चमचेगिरीतला प्रेमभाव विठ्ठलाला नाही आवडत असा प्रेमभाव... विठ्ठले आवडी प्रेमभाव नॉन मतलबी निस्वार्थ उद्देश्य नसलेला शुद्ध प्रेमभाव फ़क्त प्रेमभाव प्रेमभावासारखा प्रेमभाव विठ्ठले आवडी प्रेमभाव