समतोल


 जीव शांत शांत उभा 

लक्ष मनाकड़े नाही 

मना चाले नित्य खोड्या

जीव समतोल पाही 


फली संसार रे बाबा 

आहे कसरत थोड़ी 

मन सदा कदा ईथे

करतसे कुरघोडी


लाथ मारूनिया जीवा 

ईथे दोघही पड़ती

तव्हा हेच मन वेडे

पश्चातापाने रड़ती


मन लेकरु लहान

लक्ष द्यावेच लागते

नाही दिले ध्यान जर

बंडखोरी ने वाग़ते


बघ आता त्याचे बंड 

घाली लाथ तुझि तुला 

सारा डाव उलथुनी

सांग तोही कुठे गेला


पाठ फिरव तू आता 

बघ त्याच्या क़शा ऊड्या

घ्यावे गोंज़ारून  त्यासी

कमी होतिल रे खोड्या


लाव सवय मनाला

थोड़े तुझेही  ऐकेल

फ़ेक अमुक म्हनता

मन बघ रे फेकेल


आता दोघे दोस्त झाले 

आता दोघे फलिवर

मन शांत शांत उभे

आता नाही ख़ाली वर


समतोल हा साधन्या

दोन्ही एकरूप व्हावे

माय शंकर माउली

सवे तुझ्या नित्य धावे 

🙏🙏🙏

जय शंकर

Comments

Popular posts from this blog

दत्त

शून्य

तू माझा सांगाती । काय वर्णु तुझे....!