Posts

Showing posts from January, 2022

प्रवास

Image
सर्व प्रवासी बांधवांना नम्र निवेदन,  ख़ास आग्रहा तुन एक स्पेशल गाड़ी सुटत आहे,  *सगुण साकार ते निर्गुण निराकार* ही गाड़ी भक्ति, समर्पण, स्वीकारभाव , साक्षीभाव मार्गे निर्गुण निराकार स्टेशन पर्यंत जायिल. पूर्ण प्रवास बंधनकारक आहे, उगिच एखाद्या स्टेशन वर जास्त थांबन्याचा आग्रह करु नये, गाड़ी सूटली तर त्याच स्टेशनवर दीर्घ काल रहावे लागेल. # शिवोहम शिवोहम शिव स्वरूपोहम  नित्योहम शुद्होहम बुद्धोहम मुक्तोहम  शिव स्वरूपोहम  लहान असताना आपण एक मनी. दोन मनी, तीन मनी अशा दृश्य स्वरूपात एक दोन तीन असे मोजन्याचे तंत्र शिकतो नंतर उमजते मनी म्हंजे एक दोन तीन नव्हे , ते तर शिकन्यासाठी होते . जसे जसे आपले ज्ञान विकसित होत गेले तसा हा मन्यांच्या एका दोनाचा प्रवास पाढ़े, बेरिज, वजाबाकी, लसावि मसावि, गुणोत्तर प्रमाण , चलन , त्रिकोणमिति, इंटिगरेशन, डेरिवेशन असा किती दूर येवुन गेला, आणि गम्मत म्हंजे वेगवेगल्या रंगाचे एक दोन तीन शिकविनारे मनी कूठल्या कुठे विस्मृतित गेले, आठवलं की वाटते किती लहान होतो, आंगनवाड़ी बालवाडित होतो. आपण जर आंगनवाड़ी बालवाडित *मन रमते* म्हनून तिथेच रमलो असतो तर गणिताचे पुढ़िल मापदं

व्याकुल मन ..!

Image
परमेश्वरच्या अखंड प्रीति च्या बरसातीत चिम्ब भिजु पाहनारं व्याकुल मन…! अखंड कृपेचा वर्षाव होत असतना तृप्त होवु पाहनारं तहानलेलं मन …! अखंड आनंद घन बरसत असताना त्याला सम्पूर्ण अनुभवन्याच्या तय्यारित असलेलं आशाललेलं मन…! ह्या अवस्थेला पोहचलेलं मन देखिल ध्यान सरावनं पुष्ट झालेल्या जिवाचं…! किती छान …! उड़ानटप्पू मन व्याकुल झालय…! किती छान..! भिरभिरनारं मन स्थिर होवु पाहतयं..! किती छान…! त्याच्या व्याकुलतेला प्रामाणिक असल्याचि पावती अश्रुँनी दिलीच आहे , लबाड मनाचा सच्चेपना… किती छान ..! ही  व्याकुलता, ही तहान  ही भूक  ह्या चित्रात प्रकर्शाने जानवते…! आणि त्याला क्षणात संपवनारी ही सारी ओढ़ कोणत्या पाशाने अड़कलि आहे, कूठल्या दोरीने बांधुन ठेवलिय..! हा पाश मनाच्या चंचलतेचा..! हा पाश मनाच्या अनंत प्रलोभनांचा…! हा पाश मनाच्या प्रचंड महत्वकांक्षेचा …! हा पाश त्याच्या अस्थिरतेचा …! हा पाश एका लांबलचक यादिचा…! आणि या सगल्यांना सोबत घेवुनही…आज ते व्याकुल झालय…!तहानलय..!  ध्यानाच्या नित्य सरावाने आणि अंतरिच्या मालकाच्या  उपस्थितिचि सदैव ज़ानिवेत राहुन… आज ते व्याकुलय, तहानलय ..! हे बंधने तूटतिल….तूटन

आई ..!

Image
 गुरु माऊलिस जेव्हा कुणी माऊलि सांगतो एक आई जगी मोठी हाच अर्थ उमगतो काय उपमा ही द्यावि  जग चालकासी ईथे एक आई आणि आई  फ़क्त आईच शोभते  सांग देव काय आहे  म्हने विश्वाची जननी  देव शब्दात सांगन्या  येते आई च धावुनी आई देवाचे रे रूप  देव आईचे स्वरूप  गुरु आई आई गुरु  सारे सारे एकरूप  🙏🙏🙏 जय शंकर 🥰माऊलि🥰

खजिना…!

Image
 मन लावुनी करावे  आपापले नित्य कर्म कर्म साधन्याचे ईथे आहे एकचि रे वर्म  याचे त्याचे काय चाले  नको जीवा पाहु ईथे जो तो करी त्याचे कर्म नको ओझे वाहू ईथे उगा सवय रे तुझी ईथे तिथे डोकावतो देतो सोडोनी स्वताचे तूच तुला सतावतो तुझे झाले होते काम  खजिना रे भेटनार  दिले सोडोनी मधेच काय आता वाटनार गेला याच्या त्याच्या मागे तू रे फिरत राहिला तुझ्या अंतरिचा पाट बघ रिताच वाहीला 🥰🙏🥰

वाट..!

Image
वाट ..! देव शोधतो शोधतो देव शोधत राहतो अंतरिचा मालक रे  बघ हसुन पाहतो म्हने वाट दावी मज मला जाने त्याच्या गावा सांग तुझा कोण गाव  आधि बोध त्याचा व्हावा कोण ग़ावाहूनि आला  जावे कोण्या गावा वाटे सांग वेड्या आज तुला  कोण कोण ईथे भेटे जो जो भेटला भेटला तूज़ दूजाच भासला तुझी त्याची नाही भेट अंतरात जो बसला तू रे शोधत फ़िरतो कधी आत ही पहावे अंतरीचा मालक रे  त्याच्या सवे ही रहावे आता सापडलि वाट  नाही हरवली कधी  तूच ध्यान नाही दिले गोष्ठ होती किती साधी  तुला नको कधी साधे तुला लागे झगमग  तुला नको सहज रे  तुझी सारी तगमग तुला नको रे रिकामे तुझे सारे भरलेले टाक सांडुनिया आता  काय आता उरले रे  तोच उरला उरला  तिन्ही लोकि ज्याचा शोध  तोच होता आणि आहे  अंतरिचा हाच बोध  जय शंकर 🥰🙏🥰

देह सोन्याचा..!

देह सोनियाचि कुडी  नको समजू रे साधी  कर भक्ति घे रे नाम  कर आता कर घाई  ज्याला लोह समजुनी दिली वागणुक तशी अरे सोनियाचि काया सांग भरपाई कशी  गेली वेल ती जाऊ दे  आता पस्तावा कशाला  तूच आहे जलाशय  तरी कोरड घशाला आधि ओलख स्वतःला आहे किती अनमोल देह तुझा चन्दनाचा  सांग किती बहुमोल देह तुझा नाही साधा  आहे देवाचे मंदिर  गुरु माऊलिची साथ  आहे जीवन सुंदर  🥰🥰🥰 

समतोल

Image
 जीव शांत शांत उभा  लक्ष मनाकड़े नाही  मना चाले नित्य खोड्या जीव समतोल पाही  फली संसार रे बाबा  आहे कसरत थोड़ी  मन सदा कदा ईथे करतसे कुरघोडी लाथ मारूनिया जीवा  ईथे दोघही पड़ती तव्हा हेच मन वेडे पश्चातापाने रड़ती मन लेकरु लहान लक्ष द्यावेच लागते नाही दिले ध्यान जर बंडखोरी ने वाग़ते बघ आता त्याचे बंड  घाली लाथ तुझि तुला  सारा डाव उलथुनी सांग तोही कुठे गेला पाठ फिरव तू आता  बघ त्याच्या क़शा ऊड्या घ्यावे गोंज़ारून  त्यासी कमी होतिल रे खोड्या लाव सवय मनाला थोड़े तुझेही  ऐकेल फ़ेक अमुक म्हनता मन बघ रे फेकेल आता दोघे दोस्त झाले  आता दोघे फलिवर मन शांत शांत उभे आता नाही ख़ाली वर समतोल हा साधन्या दोन्ही एकरूप व्हावे माय शंकर माउली सवे तुझ्या नित्य धावे  🙏🙏🙏 जय शंकर

आरसा…!

Image
भेदाभेद झाला  तुझा रे स्वभाव  एकरूपतेचा  आहे ना अभाव  अहंकार तुझा तुला नागवितो  फुकाच्या गुर्मित तुला वागवितो काहीही करने  माझे मीच केले  तुच्छतेने सार्या जगा समजने  वाजवितो सदा  डंका सार्या जगा  मी माझे मीच अहंक़ारी बाधा धरावा आरसा ईथे प्रत्येकाने  ईथे तिथे जीथे तुझेच दीसने नाही राजा कुणी नाही कुणी रंक  हिशेब माँड़ता सदाही निरंक  नाही कुणी दाता  नाही हो भिखारी  मालक अंतरी  त्याचि रे चाकरी करावे नेमाने व्हावे एकरूप  आहेच आइना  दाखवि स्वरूप  🙏🙏🙏 जय शंकर ❤️❤️❤️

अंतरीच्या शक्यतांना ….!

Image
प्रश्नांचा मांडूनी पसारा खिन्न होऊनि तू बसतो उत्तरे ही साथ असता दुर्लक्षुनीया तू रुसतो वाटते मला आता हे  रुसणे अंतरी तू जोडले जे होते तुझे खरे रे  ते हसनेच तू रे सोडले सांग का कोड़े पडावे सांग का प्रश्नावली  उत्तरे ही साथ आहे  साथ शंकर माउली प्रश्न आणि उत्तरांचे द्वंद्व सारे हे मीटावे अंतरी जे साठलेले  तुझेच तुला रे भेटावे  भेट ही आहे अशी रे  वेड़ावुणी जाशिल तू  पाहुनी त्या खजीन्यासी  सांग काय होशिल तू  अमाप शक्यतांचा आहे  महासागर तूच रे  तुच्छ प्रश्न दे फेंकूनी तुझे उत्तर हेच रे  जय शंकर 🙏🙏🙏

अंतरिचे महाराज 🙏

 उत्थान होई जिवाचे। कारण तेही असे सांचे। प्रकटतात अंतरिचे । शंकर महाराज ।। श्वास सारा एक होई। आत बाह्य काही नाही । व्यापतसे दिशा दाही। शंकर महाराज । भेदाभेद काही नाही । एकरूप सारे होई। अंतरातुन सारे पाही। शंकर महाराज । ही योजना त्यांचिच। हे प्रस्थान त्यांचेच। पोहचलो जीथे तेच । शंकर महाराज । येताना तू असे शंकर । जाशिल तेव्हा तूच  शंकर । म्हनती मधेच का हा विसर। शंकर महाराज । विसर कधी न पडु द्यावा। नित्य नेम आपला बरवा। म्हनती घडो नित्यसेवा। शंकर महाराज । 🙏🙏🙏

अंतरिच्या मालकांसि…!

 विचारी किती जरी तू  हेच का अन तेच का? ग़च्च भरुनी मन ठेवले  तर राहिलच की पेच हा….!🥰 सोडवन्या हा पेच आता दे सोडूनी हे प्रश्न सारे बघ रिकाम्या बरनित या  सांग काय ते राहीले 🥰🥰🥰 तोच आज आणि उद्या काल सुद्धा तोच होता  तूच अडकुणी कुंपनात या  दूर त्यांसी ठेविले 🥰 तोड़ शृंखला या आता  मुक्त हो घे श्वास तू  श्वास हा त्याचाच आहे  का कधी तू जानिले 🥰 आनंदी आनंद आहे  आनंदी आनंद होता  तूच आनंदास या  का पांघरुनी ठेवले 🥰 आत बघ वा बाहेरी बघ आता ईथे तिथे व्यापले त्यानेच सारे  काही रिक्त न ठेविले 🥰 जो शंकर हृदयी तुझ्या तोच माझ्या अंतरी  शंकराने शंकरासी  आज रे खुनाविले🥰🥰🥰 आसवे ही टिपावि  अंतरिच्या अंतरी  काय बोलू काय सांगु भान मज ना राहिले🥰 शब्द नाही हे बोलले शब्द का कधी बोलती  अंतरिच्या मौनास बहुदा आज मी रे जाणिले🥰