Saturday, April 14, 2018

महामानव समजण्यासाठी काही प्रश्न?

महामानव डॉ बाबासाहेब या देशात जन्माला आलेच नसते तर?
हा प्रश्न स्वतःला विचारण्यापूर्वी काही गोष्टी...
1) माणसाने माणसाशी मानासासम वागणे या उक्तीला मेंदूतील प्रत्येक नर्व्ह पर्यंत पोहचू द्या.
2) त्यासाठी डोक्यातून धर्माचा कुजट वास सुटलेलं मांस काढून टाका.
3) संपूर्ण शुद्धीवर येऊन आपली अर्धवट, भिकारचोट विचारसरणी बाजूला सारा. ज्या विचारसरणीत माणसाच्या आधी माणसाची जात दिसते.
4) शोषण आणि अस्पृश्यतेचि घाणेरडी पातळी विचारातून अनुभवण्याचा यत्न करा, आणि बघा तुमची आई-बाप बहीण गळयात मडकं आणि कंबरेला झाडू बांधून दुपारी 12:00 वाजता रस्त्यावर अनवाणी चालत आहेत आणि त्यांना हे करण्यास भाग पाडणारी घाण, कुजट, सडलेली विचारसरणी आणि त्या विचारांना जन्म देणारे असे मेंदू ज्यात निव्वळ विष्ठाच भरलेली आहे.
5) वेगवेगळ्या मेंदूनी जन्माला घातलेल्या विचारांनी तयार झालेला भारत हा राज्यांचा संघ आजही एकसंघ आहे.
6) महामानवाचा मानवी हक्काचा अभ्यास, आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थशास्त्राचा अभ्यास, समाजकारण, विविध धर्मांचा अभ्यास, जल आणि जलनीतीचा अभ्यास, विविध क्षेत्रात त्यांनी मिळवलेल्या पदव्या आणि बरंच.
7) आणि वरील 6 गोष्टी वाचूनही प्रश्न विचारावा वाटतच नसेल तर मेंदूला देखील घाण चिकटलीय ती सर्वप्रथम स्वच्छ करावी लागेल.

Monday, December 4, 2017

लेकमाझी

#विठुमाय
#लेकमाझी
#माझ्या_लेकिसहित_साऱ्या_लेकींना_समर्पित

विठुमाय माझ्या मनी
रुजू लागली होतीया
जशी जशी लेकमाझी
दुडूदुडू धावतीया

विठुमाय माझ्या कानी
गुज हळू खोलतिया
जशी जशी लेकमाझी
गुलुगुलु बोलतीया

विठुमाय माझ्या घरी
ठमकुनी बसतिया
जशी जशी लेकमाझी
खुदुखुदु हसतीया

विठुमाय माझ्या देही
कशी व्यापून राहते
जशी जशी लेकमाझी
मला मायेनं पाहते

लेक विठूचं हो रूप
किती मायाळू मायाळू
विठुराया सारखीच
एक लेकच दयाळू

लेक व्यापून हे जग
प्रेम मनीं साचविल
बघा उद्या हीच लेक
साऱ्या जगा वाचवील

आज अट्टाहास तुझा
तुझा तुला नागविल
लेक वाचली पाहिजे
तीच तुला जगवील
तीच तुला जगवील

#माझी_छबुकली_गार्गी_पिल्या_तुझ्या_हसण्याचं_बळ_साऱ्या_जगाला_मिळो

#लेकमाझी_2

रूप सानुली #लेकमाझी
गोड गोजरी #लेकमाझी
माझ्या जगण्याची अनिवार ओढ #लेकमाझी
विठुरायवानी #लेकमाझी
श्याम कान्हूबा #लेकमाझी
साऱ्या जगाचं स्वप्न हे गोड #लेकमाझी
हसू लोभस #लेकमाझी
गोड गोंडस #लेकमाझी
माझ्या आयुष्याची सोनेरी दोर #लेकमाझी
नितळ निखळ #लेकमाझी
नाजूक कोवळं #लेकमाझी
जिवंत असण्याच्या साक्षीचं हो बळ #लेकमाझी
उन्हांत सावली #लेकमाझी
माय ही माऊली #लेकमाझी
माझ्या जगण्यात आशेची हो हाक #लेकमाझी

Friday, November 3, 2017

Sophisticated.

हा शब्द आपल्याला नेहमीच सहजते पासून दूर घेऊन जातो.

सहज आणि सजग ही दोन साधली की गम्मत होऊन जाते ......

आणि गम्मत कधीच sophisticated नसते.

अघळ पघळ असावं
हिशेब फिशेब नको
मोजमाप नको
सहज.....

एक अनुभव नेहमीच असतो की मी नक्की कुठे आहे आणि काय आहे....
माझी साधना खंडित आहे...
आणि त्यामुळे मी खुप चुकीचा आहे.....
परमेश्वर माला कशाचीही कमी पडू देत नाही मात्र मी त्याच्यासाठी काहीच करत नाही....वगैरे वगैरे.

हे विचार चुकीचे नाही मात्र हाच विचार करत बसने मात्र चुकीचे आहे.

यातून बाहेर निघण्याचा राजमार्ग म्हणजे
हँसने
आणि आनंदी राहणे.

हलकं फुलकं....
सहज तरल....

चला हसूयात...
सहज होउयात....
तरलता अनुभूयात....
चला हसूयात.....
😂🙏😂

Monday, June 26, 2017

राजकारण

#फिरकीविथमहेश
#राजकारण
#स्थळ:मोठया राजकीय पक्षाची ध्येय धोरण सभा
#वेळ:साहेबांचे भाषण झाल्यानंतरची
#वातावरण:प्रश्न उत्तर सत्र
#प्रश्न_सुभानचा:साहेब मागच्या महिन्यात तुम्हाला भेटायला आलेला भानू अजून घरी नाही आला.
#स्टेजवर_कानात_हळूच_कुजबुज)
#माईकवरून_अन्नाउसमेन्ट: कार्यकर्त्यांसाठी चहापाण रेडी आहे. पंधरा मिनिटांचा ब्रेक.
#प्रश्नउत्तरसत्र_परत_सुरू.

#प्रश्न_रायभानचा:साहेब भानुचं काय झालं (एक), साहेब चहा तयार नसताना ब्रेक कसा झाला (दोन), आणि  सध्या सुभान कुठे आहे (तीन)

#आत्ताबोला

Tuesday, June 6, 2017

शिवराज्याभिषेक

। बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवराय ।

माझा राजा आज राजा झाला।
रयतेचा विश्वास जागा झाला ।
तेली कोळी कुनबी सारे
बंधू माझे एक झाले
स्वराज्य माझे या राजाने
स्वप्न जे ते सत्य झाले।

जाती अन्ताचा प्रयत्न करणारा आद्य समाज सुधारक --माझा राजा

शुर लढवय्या जात सार्यांचीच हे दाखवनारा ----- माझा राजा

हिन्दू मुस्लिम दरी संपविनारा---- राजा माझा

स्री जातीचा विश्वास ---- राजा माझा

ज्याच्या साठी तानाजी हसत हसत लढत गेला असा ----- राजा माझा

ज्याच्या साठी जीवा महाला जीवा वरती उदार झाला असा----- राजा माझा


सावल्या तांडेल प्रामाणिक तो
जो म्हणाला राजाला ही
खबरदार जर टाच मारुनी येई पुढे रे गड्या
चिंधड्या उडविल राइ राइ एवढ्या
----अशी प्रशासनातील शिस्त जपनारे बहुजन वीर ओळखनारा
------राजा माझा

काय काय सांगू .....

आज ही समजू न शकलेला....
कुजलेल्या मेंदूंच्या आवाक्यात न आलेला.....
सडलेल्या बुद्धिला सतत अड्सर ठरलेला.....
कपटी कारस्थानि बुद्धि ला सतत खुपनारा.....


आणि 90%नालायक पिढीला चुकीचा समजलेला

तरी ही
ज्यांना समजला त्यांच्यातून कोटि कोटि शिवाजी जन्मांस आननारा
------राजा माझा
------राजा माझा
-------राजा माझा

शिव राज्याभिषेक दिनाच्या प्रेम आणि शुभेच्छानसह्
----महेश नवले
----पैठण.
🙏🙏🙏🙏

Friday, June 2, 2017

खोटाखोटाकृषिप्रधानदेश

#खोटाखोटाकृषिप्रधानदेश
देश माझा शेतकऱयांचा आहे म्हणे, रोज मरणाऱ्या शेतकऱयांचा, अण्णा म्हणतात #शेतीचंकायखरंनै
कोण होते आणि कोण आहेत ही लोकं ज्यांनी शेतकऱ्यावर मरणाची वेळ आणली.
मळके कपडे_सुरकूटलेला चेहरा_गरीबी हीच ओळख_माझा बाप शेतकरी आहे_आणि अपमान अशी पिढी कुणी जन्माला घातली.
#सहकार क्षेत्र सोन्याची अंडी देणारी कोंबडी _कोणी कापली.
#आज त्याचं खाजगी करून कोणाकडे आहेत कारखाने, कुठं मुरतोय सारा शेतकऱ्यांचा रक्ताचा पैसा
#शेतीप्रधान देशात कधीच उचललं नाही पाऊल शेतीच्या विकासाचं
#एवढे बेरोजगार एवढं औद्योगिकीकरण #पण यात किती शेतीप्रक्रिया उद्योग"_का कुणी लक्ष घातलं नाही यात...
#गब्बर पैसे खाऊन निब्बर झालेल्या ढेरपोट्या साहेब समाजानं नुसतं पिळलं...
#योजना आली आणि गिळली_गट्टम केली _आणि देत राहिले करपट ढेकरं #बळीराजा उपाशी पोट त्याचं खपाटी
#तळतळाट कुणाला द्यायचा ते ओळखलं पाहिजे
#संपाचं ठीक ""_पण तो निगरगट्ट राजकारण्यांना _कालचे आणि आजचे फरक पडू देईल का...
#पेक्षा शोधावे ते सारे ढेरपोटे ज्यांनी गिळलाय घास""" शेतकऱ्यांचा
आणि------------------
बघा आता त्यांचं काय करायचं ते

Monday, May 29, 2017

नाचू नाथरंगे

🤗🙏🤗
नाचू नाथरंगे
सारे
नाचू नाथरंगे🤗🙏🤗
नाचू नाथरंगे
सारे
नाचू नाथरंगे
सांडोनिया वृत्ती साऱ्या
कान्होबाच्या संगे
नाचू....

सुटे नाही मोह इकडे
प्रपंचाची गोडी
साथ कान्होबाची माझ्या
सुटे सारी कोडी
नाचू...

जोडधंदा संसाराचा
चालावा आदर
परमार्थी वृत्ती धरुनी
नाथसेवा सादर
नाचू....

चाले ते चालणार
अरे सोडू चिंता
कान्होबाच्या चरणी लिन
सुटे सारा गुंता
नाचू...

गुंता बिंता काही नाही
मनोराज्ये खेळा
मनासी तू गुंती येथे
कान्होबाचा मेळा

किती आहे गोड सारे
आनंदी आनंद
कान्होबाच्या संग नाचू
होऊया स्वानंद..

💞💞💞💞💞
💞💞💞💞💞नाचू..
सांडोनिया वृत्ती साऱ्या
कान्होबाच्या संगे
नाचू....

सुटे नाही मोह इकडे
प्रपंचाची गोडी
साथ कान्होबाची माझ्या
सुटे सारी कोडी
नाचू...

जोडधंदा संसाराचा
चालावा आदर
परमार्थी वृत्ती धरुनी
नाथसेवा सादर
नाचू....

चाले ते चालणार
अरे सोडू चिंता
कान्होबाच्या चरणी लिन
सुटे सारा गुंता
नाचू...

गुंता बिंता काही नाही
मनोराज्ये खेळा
मनासी तू गुंती येथे
कान्होबाचा मेळा

किती आहे गोड सारे
आनंदी आनंद
कान्होबाच्या संग नाचू
होऊया स्वानंद..

💞💞💞💞💞
💞💞💞💞💞नाचू..