वाट..!

वाट ..!


देव शोधतो शोधतो

देव शोधत राहतो

अंतरिचा मालक रे 

बघ हसुन पाहतो


म्हने वाट दावी मज

मला जाने त्याच्या गावा

सांग तुझा कोण गाव 

आधि बोध त्याचा व्हावा


कोण ग़ावाहूनि आला 

जावे कोण्या गावा वाटे

सांग वेड्या आज तुला 

कोण कोण ईथे भेटे


जो जो भेटला भेटला

तूज़ दूजाच भासला

तुझी त्याची नाही भेट

अंतरात जो बसला


तू रे शोधत फ़िरतो

कधी आत ही पहावे

अंतरीचा मालक रे 

त्याच्या सवे ही रहावे


आता सापडलि वाट 

नाही हरवली कधी 

तूच ध्यान नाही दिले

गोष्ठ होती किती साधी 


तुला नको कधी साधे

तुला लागे झगमग 

तुला नको सहज रे 

तुझी सारी तगमग


तुला नको रे रिकामे

तुझे सारे भरलेले

टाक सांडुनिया आता 

काय आता उरले रे 


तोच उरला उरला 

तिन्ही लोकि ज्याचा शोध 

तोच होता आणि आहे 

अंतरिचा हाच बोध 


जय शंकर 🥰🙏🥰


Comments

Popular posts from this blog

दत्त

शून्य

तू माझा सांगाती । काय वर्णु तुझे....!