दत्त
या ईथे आता दत्त
दत्त दत्त फक्त दत्त
समजावितो तो ही दत्त
ज्याला कले तो ही दत्त
आलेला क्षण असे दत्त
गेला तो ही सोडुन दत्त
या ईथे आता दत्त
दत्त दत्त फ़क्त दत्त
सांग कोठे नाही दत्त
जीथे तिथे असे दत्त
ज्याला समजे तो ही दत्त
नाही समजे तो ही दत्त
या ईथे आता दत्त
दत्त दत्त फक्त दत्त
भेटण्याची आस दत्त
भेटतसे तो ही दत्त
नाही जाण तो ही दत्त
जानिवेत असे दत्त
या ईथे आता दत्त
दत्त दत्त फ़क्त दत्त
जे जे दिसे ते ते दत्त
जे न दिसे ते ही दत्त
ऐकु येतो तोच दत्त
नाही काही असे दत्त
या ईथे आता दत्त
दत्त दत्त फ़क्त दत्त
स्पर्शुनिया गेला दत्त
स्पर्शतसे तो ही दत्त
दरवल जी असे दत्त
श्वास श्वास झाला दत्त
या ईथे आता दत्त
दत्त दत्त फक्त दत्त
मन फिरे तिथे दत्त
मन स्थिरे तिथे दत्त
मन खेले तिथे दत्त
मनोलय असे दत्त
या ईथे आता दत्त
दत्त दत्त फ़क्त दत्त
काम करे तो ही दत्त
आरामात असे दत्त
सुख दुःख निरवि दत्त
त्रिभुवनी फिरवि दत्त
या ईथे आता दत्त
दत्त दत्त फ़क्त दत्त
त्रिभुवनात वसे दत्त
दत्तात्रयी असे दत्त
एकरूपी आहे दत्त
सांग कोठे नाही दत्त
या ईथे आता दत्त
दत्त दत्त फ़क्त दत्त
❤️❤️❤️
Comments