अंतरिचे महाराज


उत्थान होई जिवाचे।

कारण तेही असे सांचे।

प्रकटतात अंतरिचे ।

शंकर महाराज ।।


श्वास सारा एक होई।

आत बाह्य काही नाही ।

व्यापतसे दिशा दाही।

शंकर महाराज ।


भेदाभेद काही नाही ।

एकरूप सारे होई।

अंतरातुन सारे पाही।

शंकर महाराज ।


ही योजना त्यांचिच।

हे प्रस्थान त्यांचेच।

पोहचलो जीथे तेच ।

शंकर महाराज ।


येताना तू असे शंकर ।

जाशिल तेव्हा तूच  शंकर ।

म्हनती मधेच का हा विसर।

शंकर महाराज ।


विसर कधी न पडु द्यावा।

नित्य नेम आपला बरवा।

म्हनती घडो नित्यसेवा।

शंकर महाराज ।


🙏🙏🙏



 

Comments

Popular posts from this blog

दत्त

शून्य

तू माझा सांगाती । काय वर्णु तुझे....!