Posts

Showing posts from December, 2017

लेकमाझी

#विठुमाय #लेकमाझी #माझ्या_लेकिसहित_साऱ्या_लेकींना_समर्पित विठुमाय माझ्या मनी रुजू लागली होतीया जशी जशी लेकमाझी दुडूदुडू धावतीया विठुमाय माझ्या कानी गुज हळू खोलतिया जशी जशी लेकमाझी गुलुगुलु बोलतीया विठुमाय माझ्या घरी ठमकुनी बसतिया जशी जशी लेकमाझी खुदुखुदु हसतीया विठुमाय माझ्या देही कशी व्यापून राहते जशी जशी लेकमाझी मला मायेनं पाहते लेक विठूचं हो रूप किती मायाळू मायाळू विठुराया सारखीच एक लेकच दयाळू लेक व्यापून हे जग प्रेम मनीं साचविल बघा उद्या हीच लेक साऱ्या जगा वाचवील आज अट्टाहास तुझा तुझा तुला नागविल लेक वाचली पाहिजे तीच तुला जगवील तीच तुला जगवील #माझी_छबुकली_गार्गी_पिल्या_तुझ्या_हसण्याचं_बळ_साऱ्या_जगाला_मिळो #लेकमाझी_2 रूप सानुली #लेकमाझी गोड गोजरी #लेकमाझी माझ्या जगण्याची अनिवार ओढ #लेकमाझी विठुरायवानी #लेकमाझी श्याम कान्हूबा #लेकमाझी साऱ्या जगाचं स्वप्न हे गोड #लेकमाझी हसू लोभस #लेकमाझी गोड गोंडस #लेकमाझी माझ्या आयुष्याची सोनेरी दोर #लेकमाझी नितळ निखळ #लेकमाझी नाजूक कोवळं #लेकमाझी जिवंत असण्याच्या साक्षीचं हो बळ #लेकमाझी उन्हा