Saturday, June 11, 2016

दाभोळकरांचा देव समजून घेताना....!

आदरणीय दाभोळकर साहेब,
आज तुम्हाला मुद्दामच पत्र लिहित आहे.
निमित्त आहे आज तुमच्याशी बोलण्याचे.
तुम्ही देवाला कधीच विरोध करत नाही उलट त्याच्या जवळ जाण्याचा, त्याला अनुभवण्याचा सहज मार्गच् तुम्ही आम्हाला सांगत असता नेहमीच, गाडगेबाबा सुद्धा असेच तुमच्यासारखे...! साहेब मुळात आम्हाला देव नकोच आहे, नाहीतर तो दिसलाच असता नं आम्हाला अन्तरात डोकवताना, निरागसपने हसतांना, मदतीचा हात देताना, हिरवाईला पाहताना, बरसणाऱ्या सरींना झेलताना आणि अनंत हातांनी कृपा बरसविनारा तो आहेच आत-बाहेर सारीकडे....... तुम्ही त्याच्याशी संवाद साधन्याची कलाच शिकवत आहात आम्हाला अंधश्रद्धा निर्मूलन नावानं...!
अंधार असा कधी नसतोच नं साहेब , उजेड नसल्यामुळे त्याचं अस्तित्व..... देवासाठी आमचे समज ही तसेच अंधारासारखे , उजेड म्हणून तुमचा विचार लख्ख प्रकाश म्हणून येतो आणि आमच्या श्रद्धे मधला अंधार लीलया काढून टाकतो.
सश्रद्ध आणि अंधश्रद्ध यातील फरकच तर तुम्ही सांगता नं साहेब...!
साहेब, श्रद्धाळु लोकं तर भक्ति जाणतात, शुद्ध प्रेम मयी भक्ति आणि ती रुजू लागली की माणसामधील देव हळू हळू खुलु लागतो.
पण साहेब , आम्हाला देव नको अन् भक्ति नको आम्हाला तर पाहिजे व्यवहार फ़क्त व्यवहार जिथं भक्त नको तर गिरहाइक् पाहिजे आणि श्रद्धाळु नको तर पेशंट पाहिजे.आणि म्हणूनच आम्ही सुरु केली आहेत दवाखाने आणि दुकाने ठिकठिकाणी...!
साहेब,
तुम्ही जेव्हा आमची अधिष्ठानं उध्वस्त होतील असे क्रांतिकारक विचार रुजवू लागले तेव्हा धर्मरक्षक या नात्याने काहीतरी करण्याची वेळ आल्यासारखे आम्हाला वाटले मात्र आमची योजना वेळीच ओळखून तुमच्यावर होणाऱ्या संभाव्य हल्ल्याचा आरोपी अटक झाल्याची आज बातमी वाचली आणि हेच निमित्त साधुन आज हे लिहित आहे.

साहेब, तुम्ही मजेत आहात नं, कारण काही लोकं म्हणतात की अडीच पावणे तीन वर्षं झाले तुम्ही शांत आहात.....
साहेब, असं कधी वाटलं नाही म्हणून....
तुमचा एक एक विचार रोज क्रांति घडवतोय म्हणून...
तुमच्या विचारांना संपवु पाहणाऱ्यांचे धाबे दनानले म्हणून....
देव आता स्पष्ठ दिसायला लागला म्हणून....
देव आणि धर्म यातील फरक दिसायला लागला म्हणून....
रोज नवे नवे उदाहरणं स्थापित होत आहेत म्हणून....
आणि म्हणून विचारलं ,
साहेब , तुम्ही मजेत आहात नं....!देव समजून घेताना
महेश नवले

1 comment:

Rohit Mohod said...

Jagat ekmev gosht ashakya ahe Ti mhanje bhartiya lokanchya manatun dev hi sankalpana mulatun ukhadun kadhne...ani Vivekbuddhi vaparun deva cha khara arth sangnaryancha asa ant hoto..karan mag dev viknaryanche dhande band padu shaktat..dabholkar sahebana shat shat naman