Monday, June 20, 2016

लेमनगोळी...!

आमच्या शाळेतल्या लिम्बाच्या झाड़ाख़ाली एक आज्जी रोज बसायची...तिचं छोटसं दुकान थाटून...!
मी चारण्याच्या लेमनगोळ्या घ्यायचो अन् दिवस भर चघळीत बसायचो.....मज्जा यायची..!
एक दिवस आज्जीच्या दुकानात एक नविनच शक्कल आली...चारण्याच्या चॉकलेट मधी एका चिट्ठित नंबर निघनार आणि त्या नंबर वरुन तुम्हाला बक्षीस....!
मी पण घेतलं आणि मला बक्षीस म्हणून लियांडर पेस चं स्टीकर भेटलं...ते मी कंपासात आतून चीटकवलं आणि घरी गेलो..!
आई ला सांगितलं आणि ते स्टीकर सुद्धा दाखवलं ......!

नंतर काय तर फटकेच फटके..!

रडलो ....... रडू थाम्बलं..!


आईने तेव्हा सांगितलं ते आज ही पक्क़ लक्षात आहे...

चारण्याच्या लेमनगोळ्या चघळण्याची मज्जा तेव्हाच संपली जेव्हा त्या चारण्यात गोळी सोबत स्टीकर आलं... उद्या कदाचित काहीच भेटनार नाही त्याच्यासोबत पण तेव्हा मात्र त्याच्यासोबत मिळालेल्या गोळीची मज्जा हरवून बसेल..कारण आता बक्षीस नाही...हाव मोठी वाईट गोष्ठ...अन् हीच जुगाराची खरी पहिली पायरी..!
आणि हे असंच होतं...!
दुसऱ्या दिवशी पासून ते आज पर्यन्त लेमनगोळीतच मन अटकवून ठेवलय....कुणी म्हणेलही कदाचित अल्पसंतुष्ठ...तर म्हणू दे......


लेमनगोळी ची गोड शिकवण मी आज ही लक्षात ठेऊन आहे.
विमल-हरी