तू माझा सांगाती । काय वर्णु तुझे....!

 1)

तू माझा सांगाती । काय वर्णु तुझे ।।

नाम तुझे घेता । जळे कर्म माझे ।।

माझे ते संपोनी । तुझे ते उरु दे।।

तूच कर्ता राहो । माझे ते मरू दे ।।

तुला कळवळा । क्षणोक्षणी माझा ।।

माझिया मनीचा । तूच शोभे राजा ।।

नको आता काही । माझे तुझे देवा ।।

हृदयी निरंतर । घडो तुझी सेवा ।।

दत्त म्हणे आता । दत्त दत्त व्हावे ।।

दत्त दत्त दत्त । दत्त ची असावे ।।


2)आज आत्ता ईथे दत्त । दत्त होऊनि निवांत ।।

दत्त उभा असे सदा । ह्रिदय मंदिरी दत्त गाभा । 

दत्त वसे चराचरी । दत्त आपूल्या अंतरी ।।

दत्त म्हने दत्त व्हावे । अवघ्या जगा सुखवावे।।

❤️❤️❤️

दत्त रूप ज़ानावे । दत्त दत्त होवुन जावे ।

नको काही छंद दूजा । ह्रिदयी मांडू दत्त पूजा ।

नको कुन्या गावा जावे । दत्त नगरी दंग व्हावे।

कुठे आहे दत्त नगरी । बघुया चला ह्रिदय मंदिरी।

दत्त म्हने दत्त भेंटो । अवघ्या जगा आनंद वाटों ।।

दत्त बसले ध्यानाला । शांत केले मनाला ।

मन धावे ईथे तिथे । आत्ता दत्तच जीथे तिथे ।

दत्त लाग़ले संसारी । मन सम्पले व्यापारी ।

आता दुःख सुख नाही । मन एक दत्त पाही ।

दत्त म्हने निवांत रहा । करतो मी जे शांत पहा ।


दत्त होवूनिया ईथे । चला निज स्वरूपा पाहु ।।

दत्त होवुनिया ईथे । चला दत्त स्वरूपच होवु ।।

दत्त होवुनिया ईथे । सांगा काय दुजे काम ।

दत्त होवुनिया ईथे । दत्त घेई दत्त नाम ।।

दत्त होवूनिया ईथे । धरु दत्ताचीच वाट ।।

दत्त म्हने चल पाहु । दत्तनगरीचा थाट ।।

❤️❤️❤️

कशाला ते जावे त्याच्या त्या दरबारी ।

अंतरी दरबार भरतसे ।।

नको गड्या हिंडु याच्या त्याच्या मागे ।

तोच अंतरात तिस्ठतसे ।।

काय हवे तुला जे तू शोधतो रे ।

अंतरी सर्व काही सापड़ते ।।

दत्त म्हने पाहु नको बा बाहेरी ।।

तुझ्या आत दत्त राह्तसे।।



संचार हां माझा तुझी माझी भेट ।

उगा काय त्यासी मिरवतो ।।

मिरवतो तेव्हा संचार बा कैसा ।

तेव्हा मीच दूर राहतो बा ।।

संचार ही माझी तुला अनुभूति ।

ज़ाणावे ते ज़ाण तू बा आता ।।

उगा नको होवु महामूर्ख जगी ।

यातना भोगन्या सज्ज व्हावे ।।

झाले होते सोने तुझे याच जन्मी ।

घान तूवा सारी कैसी केली ।।

आता निस्तारन्या जन्म जन्म जाती ।

तुला काय त्याचे देने घेने ।।

दत्त म्हने दत्त स्पर्श तो जानोनि ।

दत्त मय दत्त दत्त व्हावे ।।

❤️❤️❤️

का बा रमावे उगा भूतकाली ।

होते वैभव ते सम्पन्न हो ।।

आज आत्ता सांग काय उपलब्धि ।

गरीब तो आज कंगाल हो ।।

सत्य आता ईथे आहे तो कंगाल ।

सांग मालामाल होई कैसा ।।

झाला पैसेवाला आज आत्ता ईथे ।

उद्याचे ते काय पाहु नको ।।

आज आत्ता ईथे दत्त असे उभा ।

नको त्याचि नोंद हिशेबाला।।

दत्त म्हने उगा नको रमु झाले ।

आहे त्याचे आता काय सांग ।।

❤️❤️❤️

चला सारे आता ईथे आणि कोठे ।

आत्ता काय आहे त्याचे बोलु ।।

आत्ता काय आहे त्याचे सारे लिहु ।

आत्ता काय आहे तेच पाहु ।।

आत्ता काय आहे नाचू धुंद त्यात।

गाऊ गाने आत्ता ईथे दत्त ।।

दत्त म्हने मीच आज आत्ता ईथे ।

उगा नको ईथे तिथे भटकन्ति ।।

❤️❤️❤️

Comments

Popular posts from this blog

दत्त

शून्य