Wednesday, June 8, 2016

दरोडेखोर...!

वाल्या कोळी एक सुप्रसिद्ध दरोडेखोर...!
वाल्मीकि एक महान कवी...साहित्यिक वगैरे...
आणि
वाल्या कोळी आणि वाल्मीकि दोन्ही व्यक्ति एकच ..... 
हा एक डोळ्यात अंजन घालनारा योगायोग....!
वाल्मीकि होण्यासाठी वाल्या कोळ्याला त्याचा जन्म आणि त्याचे कर्म दोन्हीही आडवं आलं नाही हे एक दुर्लक्षित सत्य...!
आणि वाल्या कोळ्याचा वाल्मीकि होण्यासाठी कारणीभूत ठरलेला एक महत्वाचा क्षण असा की वाल्याला त्याच्या घरच्यांनी एका योग्य क्षणी नाकारलं ते....!

आज आपल्या आजुबाजूला कित्येक वाल्या कोळी टाकत आहेत दरोडे सरसकट... ....
कित्येक तर दरोडा हे आद्य कर्तव्य समजून केलेल्या भ्रष्ठ आचरणाचे नैतिक समर्थन देतात.....
कित्येक जन ग़ाफ़िल आहेत बायका मुलांना पैशातुन मिळनारी प्रतिष्ठा पाहून......
कित्येकांनी तर दरोडा हाच जीवनमार्ग करुन घेतलाय.....
कित्येक दरोडेखोर पांघरून आहेत भम्पक नैतिकतेचा बुरखा.....आणि लीलया करीत आहेत भ्रष्ठ आचरण......

आणि याच दरोडेखोरांची पिलावळ करत आहे निर्लज्ज थयथयाट भरदिवसा....भरचौकात.....नग्नताण्डव...!

या साऱ्या वाल्या कोळ्यांचा वाल्मीकि कधी होणार.....!
त्याच्या आयुष्यातला तो प्रसंग येईल का यांच्या आयुष्यात....!

आज मला तो क्षण आठवतो 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय' मधला....
आणि त्याला स्मरून मी छाती ठोकुन सांगतो....
"माझा बाप ईमानदार आहे".

तुमचा बाप दरोडेखोर तर नाही ना.....!


ठोकम् ठोक विथ
महेश नवले
9763147471

No comments: