Thursday, June 30, 2016

निब्बर मनाची गब्बर यंत्रणा...!

साधारण दहा साडे दहाच्या आसपास आम्ही तिथे पोहचलो.
आम्ही पोहचन्यापूर्वी पंधरा वीस जन हॉल मधे बसलेले होते. त्यात चार पाच जनी होत्या आणि बाकीचे....!
गेल्या पंधरा वीस दिवसांपासून हे सारे जन एकाच गोष्टिवर काम करत होते आणि आज त्यांच्या कामाची पाहणी करुन पुढील रूपरेषा सावनेरकर साहेब  सांगणार होते.
प्रत्येक जन सावनेरकर साहेबांची वाट पाहत सोबत आणलेल्या फ़ाइल मधे बघून अति विशेष अशा प्रकारात सहज बसेल अशी चर्चा करत होते.

तशी हॉल मधे व्यवस्था छान होती...एयर कंडीशन मधे कोपऱ्यात कॉफी मेकर मशीन होती आणि प्रत्येकाच्या समोर मिनरल वाटरच्या बाटल्या पोज़ देत होत्या....!
समोरच्या प्रोजेक्टर स्क्रीन वर लिहिलेलं मी वाचत होतो तितक्यात सावनेरकर साहेब आणि त्यांचे सहकारी असे एकूण चार जन आत आले.

खुपच मोठा अर्थपूर्ण पॉज घेऊन साहेबांनी बोलायला सुरुवात केली,"आज आपण सर्व जन या ठिकाणी 'एकात्मिक कुपोषण निर्मुलन कार्यक्रम' अंतर्गत कुपोषणाची कारणे आणि उपाय या वर तुम्ही केलेल्या कामाची तपासणी करणार आहोत"

एक एक करून साहेबांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सगळ्या फाइली तपासल्या आणि काही दुरुस्तीचे शेरे सुद्धा दिले.
या सगळ्या प्रक्रियेत साहेबांचा तब्बल अर्धा तास वेस्ट गेला.
पुढच्या वेळी चूका व्हायला नको अशी सक्त ताकीद देऊन साहेब त्यांच्या पुढील 'नियोजित' कामासाठी निघुन गेले. आणि आजची बैठक संपली.

जाताना सर्वांनी नियोजित असलेले दुपारचे जेवण मनसोक्त उरकुन पुन्हा 'कुपोषणावर' जोमाने काम करण्यासाठी आपापल्या गावचे रस्ते धरले.

रात्रि उशिरा घरी पोहचल्यावर मी सहजच आजची बैठक रिकॉल करत होतो तेव्हा सावनेरकर साहेबांनी मला सुचवलेली दुरुस्ती आठवून डोळ्यातून पाणीच आलं......

सुचवलेली महत्वाची दुरुस्ती---

"तुम्ही जे हे कुपोषित बालकांचे फ़ोटो लावलेत फ़ाइल मधे ते जरा नीट आणि क्लियर क्वालिटीचे लावा जरा....बालक कसं कुपोषित म्हणजे कुपोषितच दिसायला हवं"

कुपोषणाचे खरे कारन म्हणजे हे सारे ढेरपोटे साहेब.....जे खाऊन खाऊन नुसते गब्बरच नाही तर लहान लेकरांच्या तोंडचा घास घेऊन पक्के निब्बर झाले आहेत.

निब्बर लोकांनी मऊ व्हावे म्हणूनच
आजची ही फिरकीBy
Vimalhari

1 comment:

Rohit Mohod said...

Paristithi chi janiv aslelyanchi kamtarta bhaste jagojagi