Thursday, June 23, 2016

फकिराचे दोन शब्द...!

||एक||

गुरु भक्ति ही रुजावी
समर्पण ही वाढावे
साधने च्या झऱ्यातूनि
मनी मळभ काढावे

गुरु माऊलीची कृपा
त्याले नाही मोजमाप
सद्गुरु वाचोनिया
कोण हरविल ताप

गुरु उपदेशामधी
एक तत्त्व हे रुजले
कोरडे हे विश्व तुझे
गुरुकृपेत भिजले

आज साधुनिया घ्यावे
आज भाग्य हे दाटले
गुरु कृपेचे हे क्षण
याची जन्मांत भेटले

आता नको दूर लोटु
आता जीव हा अर्पुनि
आता घे तू साधुनिया
जन्मों जन्मिचि पर्वणी


||दोन||

शत्रु कामरूपी
अर्थ बुद्धिनाशी
लक्ष् ठेव सारे
दुःखाच्या रे राशी

गनगोत सारे
मित्र शत धन
गुंतवु नको रे
यात् तुझे मन

वासना जन्मे जिथं
आहे संसार संसार
उठ याहुनि ऊपर
वैराग्यचे हेच सार

तुझी तहान तहान
हीच साखळी पायात
सोड तिची साथ गड्या
तवा येशिल लयात

तूच शुद्ध तूच सत्य
बाकि सारं झूठ आहे
किती सोप्प गूढ़ गड्या
जान हीच तूच पाहे

किती गड्या जन्म झाली
किती शरीर नासले
तरी सूटना ही आस
तरी सत्यच भासले?

नाही व्यर्थ घालविले
गड्या पुण्य कमविले
साक्षीभाव न जपला
संचितच जमविले

किती जन्मं फुका गेले
दुःख कर्मे त्वां केले
सोड कर्ता पण आता
साक्षी नेच मोक्ष आले


By
Vimalhari