मनमौजी फ़कीरा..!

आज काल मनमौजी मस्तमौला फ़क़ीर भेटन्यासाठी आतुरच असतो पण मीच त्याच्याकडे खूप दुर्लक्ष करीत असतो..... ऑफिसच्या गड़बडीचं कारन तर कधी आम्लपित्त... कधी मित्राशी महत्वाच्या कदाचित नसलेल्या गोष्टिसोबत गप्पा.... आणि बरंच आणि सहसा निरर्थकच्....

सहज भाव असावा म्हणून करावं असं काही....
तर पुन्हा प्रश्न पडतो करत असलो आवर्जून तर भाव सहज कसा म्हणावा...?

असो....

आज पुन्हा भेटले हो
मला कालचे फ़क़ीर
म्हणे कारे तू उदास
कारे करितो फिकिर

जरा बोल गड्या ईथे
नको मनामधी ठेऊ
व्यक्त होणं मोठं सूत्र
समजून जरा घेऊ

हसु आणि विसरणे
जसे आहे मोठे सार
तसे बोलने सरळ
नको बसु गप्पगार

जसं मनामधी आहे
तसं जनामधी ठेव
नको उगी लपाछपी
तवा दिसतो रे देव

देव तुझ्या मनामधी
तूच झाकून ठेविला
काढ़ एक एक थर
बघ देवच राहिला


एका हृदयशस्त्रक्रिया दालना बाहेर लिहिले होते की.....
वेळीच योग्य ठिकाणी ओपन केले असते तर आज कात्रीने उघडायची वेळ आली नसती।


चला सारे व्यक्त होउयात....
हसूयात....
विसरुयात.....
आणि व्यक्त होउयात....





Comments

Popular posts from this blog

दत्त

शून्य

तू माझा सांगाती । काय वर्णु तुझे....!