मस्तमौला फ़क़ीर...!

मस्तमौला फ़क़ीर, मनमौजी अवलिया भेटला काल....
नजर भीड़लि आणि फ़क़ीर बोलू लागला.....
आकाशात गूढ़ नजर स्थीर करत,

"मन कोषामधी असं
फूल पाखरू पाखरू
मोठं होऊ पाहे जीव
गोड मधाळ साखरू......

मना धडपड अशी
कशातच हो रमंना
निघु पाहे कोषातुन
तरी त्याला ते जमंना.....

चालू दे रे धडपड
जशी सहज स्वीकार
नाही तर कोष तुझा
अन् त्याची तू शिकार.....

मना वाट पाहे रोज
बळ नीतनेम वाढे
हळू हळू तेच बळ
त्याले कोषातुन काढ़े.....

नको घाई धरसोड
अगा नीतनेम बरा
कोष आपोआप तूटे
बघ पडल्यात चीरा.......

बघ भासू लागलेत
जीवा उडण्याचे बळ
अगा तुझ्या पखामधी
दम धर थोड़ा येळ......

कोष कशासाठी आहे
त्याले कळते कळते
तूझी धडपड मेली
तूझी तुलाच छळते.....

तूझी धडपड मेली
तूझी तुलाच छळते......."


आकाशात स्थिरावलेली ती गूढ़ नजर अस्तित्वाशी एकरूप झालेली.....
रुजवित होती अस्तित्वाशी असलेलं खरं खुरं नातं....
ईश्वरी शक्तीचा खराखुरा स्पर्ष......
जो भेटतो फ़क्त आणि फ़क्त सहजतेतून....
मुक्त स्वातंत्र्यातुन....
बंधनमुक्त प्राणातून.....
उघडलेल्या मनांतून......
स्वीकृतिच्या भावातुन......
आणि अपेक्षाशून्य ओढितून.....


फ़क़ीर---"सारी मुखवटे लीलया काढून ठेवलेला मानुस...!"

माणूस--"सारी विकारी व्रुत्ती लीलया सांभाळून ठेवलेला भिकारी....!"

फरक इत्तुसा...!



फ़क़ीर समजून घेताना....
महेश नवले

Comments

Unknown said…
खुपच छान

Popular posts from this blog

दत्त

शून्य

तू माझा सांगाती । काय वर्णु तुझे....!