Wednesday, June 22, 2016

नरसिंग्या....!

:"काय रे सुम्या, इथं काय बसलास एकटाच....!"
:"असंच...!"
:"आज परत काही बोललं का काय तूला ते नरसिंग्या....!"
:"हव....पण माझी कैच चूक नवति, मी तं उलट दीड तासांपासून उन्हातच हुभा होतो...!"
:"मंग, काय बोल्लं ते..."
:"त्यों मला म्हटला की तुला काय सावलीत बसायचे पैशे देतो काय."
:"सावलित ?"
:"हव्..त्यों आला तवा मी टेकलो वतो उल्शिक सावलीला....अन् तेवढ्यात त्यों आला."
:"सुम्या, तुला किती वेळा बोललो मी...नरसिंग्या लै कडु हाई ते.."
:"च्याला पम्या लै जीव वैतगला गड्या...काहीबाहि ईचार यतेत डोक्यात..."
:"अय, असं काय यड्यावाणी करतो सुम्या...तूच मला किती धीर देतोस गड्या अन् तूच असं बोलल्यावर काय कराव बबा मंग.......तूच बोलला हतास न की कही लोकं आजारी अस्तेत म्हणून...नरसिंग्या असाच आजारी है बघ...लै बेक्कार आजार असतो भो ह्यव्... त्याला बी कई कळत नै काय करतोय त्यों ते...! तेच कसं हे न सुम्या ह्या आजारात् लै मोठे मोठे गेलेत भो...! पण एक सांगतो बघ सुम्या कई होत नै बघ...!फड़फड़ करुन यतेत परत लाइनीवर...!अन् एक लक्षात ठेव भो काळ हेच मोठ्ठ् औषध हे बघ यांच्यावर."
:"बरोबर म्हणतो पम्या तू अन् च्यायला सगळं करुन सवरून बी नरसिंग्या असं वागतो म्हंटल्यावर कसं वागाव बॉ आता.."
:"हे बघ सुम्या कोण कसं वागतय हे कही आपल्या हातात नै, किती साऱ्या परकारचे लोकं...किती त्यांचे स्वभाव...कोना कोणाला डोकं लावायवचं गड्या...! दे सोडून..! अन् राहिली गोष्ठ नरसिंग्याची तर त्याला डोक्यात घ्याचं म्हटलं तर आपल्यालाच डोकं नसल्यासारखं हे बघ."
:"हव न यार, तुझ्या माझ्या मधी असाच एखान्दा नरसिंग्या असंल का रे...ज्याला कहिच दिसत नहीं...न मागचं न पुढचं...!फ़क्त स्वता पुरतं तेवढं दिसतं...अन् ज्याचा ईश्वास नै कोनावरच कधीच...जो खरं तर असतो घाबरलेला सवताच सवताला....ज्याला दुसर्याच्या हसन्याचाबी लै तरास होतो...ज्याला तुड़वायचं असतं सार्यांना पायखाली...अन् ज्यो रुतलेला असतो सवताच्या अविश्वासाच्या चिखलात....खोलवर...!"
:"सुम्या, एवढा ईचार करतो म्हटल्यावर तू सुम्याच् न भौ...
तुझ्यात कुठून यायचा बबा नरसिंग्या ते...!"

अन् असलाच तं जाळून टाक रे भौ तुझ्यातल्या नरसिंग्याला.....लौकरात लौकर....! 
खूप हसायचय अन् खूप जगायचय भो....!चला जगुयात
विमल-हरी

3 comments:

Preetish Labade said...

चला हसूया, चला जगूया

Rohit Mohod said...

Sir ekhadi post current govt var bnnvavi

Sanjay Humania said...

Graet Post