दगड

दगड हो दगड 

नाद कानी हा घुमतो 

होण्या दगड मि आता 

दगड़ात हो रमतो 


आला वारा गेला वारा 

दगड हा साक्षी त्याचा 

नाही आल्याचा आनंद 

शोक नाही हो गेल्याचा 


आहे असतो नेहमी 

दगड हो दुनियेत 

काय असतो असून 

समजते जानिवेत 


असुनिया नसे असा 

दगड हो दगड तू 

नाही नाही का म्हणावे 

असताना दगड तू 


स्थिर निश्चल हा जगी 

घाव जगाचे सोसतो 

साक्षिभाव हृदयीचा 

दगडच की असतो 


अंतरीच्या मालकांना 

भेटण्याची खूण हाच 

स्थिर आणि साक्षितुन 

देई प्रमाण हे सांच 


होई दगड तू आता 

बघ दिसेल रे देव 

नको धरु हे ही ते ही 

सोड सारी उठाठेव 

🙏🏼🙏🏼🙏🏼

Comments

Popular posts from this blog

दत्त

शून्य

तू माझा सांगाती । काय वर्णु तुझे....!