रिकामा हो रिकामा

 पाहतो तो सदाही

सर्वकाल सर्वकाही 

तूच लोचने ही तुझी 

झाकुनि का ठेवीले 


स्पर्शितो तो तुला रे

रोमांच बघ हे दाटले 

तूच रोमंचित या 

देहांस का न पाहिले 


बोलतो तो तुझ्याशी 

जे असावे तुज सवे 

बोलने हे तुझ्याशी 

तूच का न जाणिले 


गंध हा सर्वेश्वराचा 

दाटला दाही दिशा 

तुज पासोनी तूच का 

दूर त्यांसी ठेविले 


सांडूनिया रिक्त व्हावे 

मोकळे आकाश रे 

कृष्ण अभ्रांस याच वेळी 

सांग का बोलविले 


किती अट्टाहास तुझा 

दूर त्यांसी ठेवणे 

राहतो तुझ्या अंतरी रे 

का कधी न पाहिले 


वाचले किती जरी तू 

हेच का अन तेच का 

ज्ञान हे तुझे रे वेड्या 

अजूनि का न फेकिले 


साधा सोप्पा सरळ 

रिकामा हो रिकामा 

अंतरीचे मालक तुझे रे 

बघ उभे ते ठाकले 


🙏🏼🙏🏼🙏🏼

Comments

Namrata said…
Excellent 👌👌
Firki said…
Thank you 🙏🏼
Firki said…
Thank you 🙏🏼
Firki said…
Thank you 🙏🏼
Unknown said…
Very nice MAHESH Sir

Popular posts from this blog

दत्त

शून्य

तू माझा सांगाती । काय वर्णु तुझे....!