अंतरीचे मालका रे

 दिसमान बरे नाही 

असे का रे तू बोलतो 

बघ कैलासाचा राणा 

तुजसवे रे डोलतो 


साऱ्या त्याच्या रे योजना 

तोच बघ राबवितो 

झाल्या गेलेल्या क्षणाला 

तूच का रे आठवितो 


श्वास त्याचा रे घेतला 

श्वास त्याचा रे सोडला 

सारे हक्क त्या स्वाधीन 

प्रश्न मोट्ठा का पडला 


उगी म्हणतो का मग 

देवा तूच सारं तुझं 

जेव्हा घेतो तो तयाचे 

का उगी माझं माझं 


अशी त्याची रे करनी 

तुला नाही रे ठिकाना 

तूच कावरा बावरा 

हो रे आधी तू रिकामा 


आले आले गेले गेले 

ज्याचे त्याचे त्याच्या गावा 

वृत्ति तुझी स्थिर राहो 

घडो त्याची नित सेवा 


बघ तूच तुला आता 

दूर उभा ते राहून 

लीला त्याची त्याचे खेळ 

दंग होशील पाहून 


आता होणार तू त्याचा 

दिले झोकून झोकून 

त्याने गिळले रे तुला 

बघ नजर रोखून 


आहे तुजसवे तोच 

काल आज आणि उद्या 

अंतरीच्या मालका वर 

दृढ़ विश्वास राहुद्या 


🙏🏼🙏🏼🙏🏼

Comments

Unknown said…
Excellent.....!
Unknown said…
सुंदर सर ♥️👍👍
Unknown said…
Ekadm badiya paa
Firki said…
Thank you 🙏🏼
Vishwase Hrushikesh said…
Amazing piece of writing, really got attached to the thing that how those words spoke to me and washed out many confusions in just simple words.

Popular posts from this blog

दत्त

शून्य

तू माझा सांगाती । काय वर्णु तुझे....!