Monday, May 29, 2017

ध्यानसागरा...

जशी सागरा मिळून
नदी भेटया येतसे
बाप डोंगरा भेटून
नदी वाहून जातसे

तसा साधक ध्यानांत
गुरुमाउलीस भेटे
भेट घेऊन तो पुन्हा
संसारीचे दुःख वाटे

जशी वाफ हो होऊन
वारा नदीला वाहतो
तसा हात हो धरून
गुरु साधका पाहतो

जशी नदीची हो ओढ
सागरांस हो भेटाया
तशी ओढ ठेव मनी
सद्गुरूच्या हो ठाया

ध्यान भक्तीच्या त्या धारा
वाजे मनोमनी वाळा
निरंतर भिजोनिया
ध्यानमयी पावसाळा
💐💐💐💐

No comments: