Sunday, October 30, 2016

तरच...Happy Diwali...!

आली दिवाळी आली....!
उटणे लावून शरीरं स्वच्छ झाली.....!
नवे कोरे कपडे....शरीरं झाकली गेली..!
दिवे पेटले..... आकाशकंदीलाचा प्रकाश पडला.....!
फराळ झालं.....कुरकुरीत कधी गोड धोड.....!
फटाक्याची आतिषबाजी....आवाज अन झगमगाट....!
दिवाळी आलेली आहे....!
तिच्या सगळ्या ठरवून ठेवलेल्या लक्षणांनी ती आली आहे हे लक्षात येतंय...!
हो दिवाळी आलेली आहे...!

पण,

प्रेमाच्या सुगंधी उटण्यांनी मनं स्वच्छ झाली पाहिजे...!
आणि प्रेमाचा सुगन्ध सर्वदूर पसरविणारे मनं तयार झाली पाहिजे....!
नैतिकतेच्या नव्या कोऱ्या कपड्यांनी मनं झाकली गेली पाहिजे म्हणजे ते आणखी खुलेल आणि लाजही राहील.....!
सजगतेचा आकाशकंदील आणि प्रामाणिकपणाचा दिवा मनांत पेटला पाहिजे....आणि स्वतःची चाललेली स्वार्थकेंद्री पैशाची हावरी धडपड लख्ख दिसली पाहिजे.....!
तृप्तीचे फराळ मनाला मिळालं पाहिजे आणि जे आहे ते पुरेसं आहे ही जाणीव मनांत भरून उरायला हवी.....!
जागृतीच्या फटाक्यांच्या आवाज आणि प्रकाशाने मन भानावर यायला पाहिजे आणि मनानं चालवलेली अंदाधुंद धडपड आता तरी थांबली पाहिजे....!


आणि तर आणि तरच.....

HAPPY DIWALI

नसता....
सणासुदीच्या शुभेच्छा...!

-महेश हरिभाऊ नवले.
No comments: