Monday, January 30, 2017

Human rights आणि ढोंग आणि स्वच्छ भारत अभियान...!

Human rights आणि ढोंग आणि स्वच्छ भारत अभियान...!

तथाकथित 'माणूस' म्हणून घेणाऱ्या ढोंगी लोकांना चित्र बघूनच मळमळायला होत असेल मात्र माणूसपण नेमकं कुणाचं जपायचं, कुणी जपायचं अन कुठपर्यंत जपायचं...!
जेव्हा जेव्हा गटार साफ होत असताना आपलाच एक बांधव गटारात पूर्ण बुडालेला असतो तेव्हा तेव्हा त्याला 'सेफ्टी' म्हणजे काय 'ती' कधीच नसते.
त्याच्या जगण्याच्या अधिकाराची पर्वा करणं तर दूरच, उलट भंपक मानवतेची लक्तरे टांगून मज्जा बघनर्यांची आणि कसलेतरी भाव चेहऱ्यावर आणून नाकाला रुमाल लावणाऱ्यांचीच प्रतिष्ठा धोक्यात येत असते.
त्या स्वच्छ काम करणाऱ्या बांधवांच्या कामाला प्रतिष्ठा तर सोडाच , सहानुभूती सुद्धा नाही.
ते सारे बांधव खरेच ग्रेट आहेत आणि त्यांचं काम सुद्धा...!
आपल्याच मनात गटारं तुंबली आहेत, घाण, घाणेरडी, भंपकपणाची गटारं, खोटारडेपणाची किळसवाणी घाण, अहँपणाची किळस, आणि आणि  घाण ते सारं...!
गटारीत उतरताना त्रास होऊ नये म्हणून अंगाला तेल लावणे आणि गटारीची घिन नाकात बसू नये म्हणून दारू पिणे हे कुठल्या मानवी हक्कात येतं?
माणूस म्हणून जन्माला येणं म्हणजे काय निव्वळ हात, पाय, डोळे आणि कान का?
जगण्याचा अधिकार असा काही नाही का?
विषारी रसायनांनी ते जीवन्त राहत असतील का?
डेटॉल नं हात धुणारे नाही धुतला तर पडतात नं 'लगेच' आजारी तर यांची आणि यांच्यामुळे कुटुंबात पसरणाऱ्या आजाराचं काय?
यांचं जगणं आणि मरणं सुद्धा इतकं स्वस्त का आणि कुणी केलं?
'स्वच्छ भारत अभियान' फक्त झाडू हातात घेऊनच का;
का उतरलं नाही कुणी अजून गटारात 'स्वच्छ भारत अभियान' म्हणून...सेल्फी काढायला?
ढोंगं सोडा, नाटकं बंद करा, आणि माणूस म्हणून घेणाऱ्या हिंसक जनावरांनो...
जरा
या बांधवांच्या  'human rights' चा जरा विचार करा.

आणि 'अच्छे दिन' वाल्यांनी देखील 'माझा भारत खऱ्या अर्थानं स्वच्छ करणाऱ्या' या सर्व शूरांना त्यांच्या जगण्याचा अधिकार द्यावा आणि तो देणे हे तुमच्यावर बंधनकारक आहे.

सफाईकाम करणाऱ्या समस्त बांधवांना समर्पित....
तुम्ही खरंच ग्रेट आहात.

Wednesday, January 25, 2017

26 जानेवारीचे उपकार...!!!

#26 जानेवारीचे उपकार...!!!

जगण्याची व्याख्याच नव्हती
आणि मरणं हेच जन्मसिद्ध जगणं होतं....
आणि स्वातंत्त्र्य कि काय ते झालो...
आम्ही पण तुमच्यासोबत...
अहो तुम्हीच तर सांगितलं की आता 'तुम्ही स्वतंत्र झालात म्हणून....'
अन तेव्हा पासून शोध
'आमचा
आमच्याच स्वातंत्र्याचा....'
आणि गंमत म्हणजे
कळाला बरं फरक
'आम्हाला'
'आमच्यातला अन तुमच्यातला...'
मग कोंडमारा फुटला
आणि
रक्तात पेटून उठले अगणित सूर्य...

26 जानेवारीचे उपकार...
कारण
क्रांतीची आग अन बंडाचा राग...
दोन्हीला धार दिली ती
फक्त आणि फक्त संविधानाने....

त्याच निमित्ताने पुन्हा एकदा आव्हान ...
त्या सर्व क्रांती सुर्यांना....
संविधान आहे म्हणून जगलो, लढलो आणि जिंकलो
लढाई अजून संपली नाही....
आणि सूर्यास्त आता होणार नाही....!
#happy Republic day

Mahesh NAWALE

Monday, January 9, 2017

नर्व्हस नाईनटी

नर्व्हस नाईनटी

शतकाच्या जवळ आल्यानंतर येणाऱ्या नर्वसनेसला "नर्व्हस नाईनटी"असे म्हणतात.
जगात खूप कमी म्हणजे अगदी दुर्मिळ क्रिकेट प्लेयेर्सला या प्रकारच्या नर्व्हसनेस चा सामना करावा लागला.

बॅडमिंटन एकेरी, टेनिस एकेरी, चेस, आणि तत्सम क्रीडा प्रकारात एकटा प्लेअर लढत असतो आणि देशाचे प्रतिनिधित्व करत असताना विजयाच्या जवळ आल्यावर नर्व्हस वगैरे होताना आपण बघत असतो.

मात्र क्रिकेट हा अकरा जणांची एक टीम असलेला क्रीडा प्रकार असताना संघाच्या विजयाशी येताना येणारा 'नर्व्हसपणा' वयक्तिक शतकाच्या जवळ आल्यावर जेव्हा येतो तेव्हा त्याला कोणत्या व्याख्येत बसवावे ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे 'नर्व्हसनाईनटी'.

अखिल विश्वात 'नर्व्हस नाईनटी' वाले प्लेअर नाममात्र आहेत, मात्र जे आहेत त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावर करत असताना स्वतःचे शतक जवळ आल्यावर कमी होत जाणारा धावांचा वेग आणि त्यातच आऊट होण्याच्या या क्रीडा प्रकाराला विशेष हळहळ प्राप्त करवून दिली आणि आपल्या भारत देशात हि हळहळ जास्तच प्रकट झालेली दिसून आली.

हल्ली भारतीय क्रिकेट मध्ये विराट विराट शतक होत असताना 'नर्व्हसनाईनटी' हा अवगुण मात्र हद्दपार झालेला दिसून येत आहे.आणि हि विशेष आनंदाची गोष्ट आहे.

महेंद्रसिंग धोनी नावाच्या एका विशेष आणि खऱ्या खुऱ्या खेळाडूने देशाला 'जिंकणं' या प्रकाराची सवय लावली आणि अटी तटीच्या सामन्यात सुद्धा आपला एकही खेळाडू आणि पाहणारा दर्शक ' नर्व्हस' होत नाही हे विशेष, उलट सारंच कसं उत्सव उत्सव होऊन जातं.

आता हे वाचल्या नंतर बऱ्याच जणांना नर्व्हस पणा येऊ शकतो आणि ' नर्व्हस नैन्टि' जर सोडलं तर बाकी किती विशेष होतं अशी ओरड सुरु होऊ शकते.
मात्र त्या सर्व ' नर्व्हस नैन्टि' समर्थक आणि भक्त मंडळींना मला एवढेच सांगायचे आहे की आजच्या ' फिरकी विथ महेश' चा विषय 'नर्व्हस नाईनटी' हा असल्या कारणाने केवळ तथ्याच्या आधारावर याचा विचार करावा उगीच आपण किती मोठे भक्त आहोत हे सिद्ध करत बसू नये.

 'नर्व्हस नाईन टी' हि भावना हद्दपार होवो आणि देश नवनवे रेकॉर्ड घडवीत राहो.

वाचत राहा
फिरकी विथ महेश नवले

Sunday, January 8, 2017

भीष्मांसारखा इच्छामरणी फक्त धोनी...!

भीष्मांसारखा इच्छामरणी फक्त धोनी...!

MSD थँक्स.
धोनी,
तू नसताना सुद्धा आम्ही क्रिकेट बघायचो, पण जिंकणं आणि फक्त जिंकणं आम्हाला ठाऊकच नव्हतं, मुळात आमची जिंकण्याची खरी व्याख्या फक्त पाकिस्तान विरुद्ध जीवन्त राहत असे, अन्यथा आम्ही कुणाचं शतक झालं की हरखून जायचो आणि त्यातच आम्हाला जिंकल्यासारखं वाटायचं, खेळायला आलेला प्रत्येक जण आम्हाला ड्युटी वर हजर झाल्यासारखा वाटायचा, अकरा जण एक एक करून बळजबरीने टीम या व्याख्येत बसत होते.

आणि खरं सांगू, क्रिकेट मध्ये अकरा प्लेअर मिळून असतात हेच आम्ही विसरून गेलो होतो, आमच्या साठी इंडिया म्हणजे एकाच हाताच्या बोटावर मोजता येईल अशी टीम आणि त्यातही राहुल द्रविड वगळता सारे आपली स्वतःची टीम बनवून  भारत हरला तरी स्वतः जिंकतिल अशी तरतूद करणारे होते.

धोनी तू आलास आणि वीज चमकावी तसं काही चमकून गेलं, हळू हळू चित्र पालटलं, अकराच्या अकरा जणं दिसायला लागले, खेळायला लागले, आणि जिंकायला लागले.
तुझ्यामुळे देश जगज्जेता झाला, यापूर्वी रेकॉर्ड खूप झाले मात्र ते देशाच्या प्लेयेर्सच्या नावावर होते, तू मात्र देशाच्या नावावर रेकॉर्ड जोडले.

धोनी तूच भीष्मासारखा इच्छामरणी आहेस, तुला कुणी निवृत्त हो असं म्हणत नाही की तुला कुणी captaincy सोड असं म्हणत नाही,
तुझे निर्णय हे तुझेच असतात आणि
संपूर्ण भारत देश तुझ्यासोबत आहे.
MSD तूच महान आहेस.