खजिना…!

 मन लावुनी करावे 

आपापले नित्य कर्म

कर्म साधन्याचे ईथे

आहे एकचि रे वर्म 


याचे त्याचे काय चाले 

नको जीवा पाहु ईथे

जो तो करी त्याचे कर्म

नको ओझे वाहू ईथे


उगा सवय रे तुझी

ईथे तिथे डोकावतो

देतो सोडोनी स्वताचे

तूच तुला सतावतो


तुझे झाले होते काम 

खजिना रे भेटनार 

दिले सोडोनी मधेच

काय आता वाटनार


गेला याच्या त्याच्या मागे

तू रे फिरत राहिला

तुझ्या अंतरिचा पाट

बघ रिताच वाहीला

🥰🙏🥰


Comments

Popular Posts