देह सोन्याचा..!

देह सोनियाचि कुडी 

नको समजू रे साधी 

कर भक्ति घे रे नाम 

कर आता कर घाई 


ज्याला लोह समजुनी

दिली वागणुक तशी

अरे सोनियाचि काया

सांग भरपाई कशी 


गेली वेल ती जाऊ दे 

आता पस्तावा कशाला 

तूच आहे जलाशय 

तरी कोरड घशाला


आधि ओलख स्वतःला

आहे किती अनमोल

देह तुझा चन्दनाचा 

सांग किती बहुमोल


देह तुझा नाही साधा 

आहे देवाचे मंदिर 

गुरु माऊलिची साथ 

आहे जीवन सुंदर 

🥰🥰🥰 

Comments

Popular Posts