आई ..!

 गुरु माऊलिस जेव्हा

कुणी माऊलि सांगतो

एक आई जगी मोठी

हाच अर्थ उमगतो


काय उपमा ही द्यावि 

जग चालकासी ईथे

एक आई आणि आई 

फ़क्त आईच शोभते 


सांग देव काय आहे 

म्हने विश्वाची जननी 

देव शब्दात सांगन्या 

येते आई च धावुनी


आई देवाचे रे रूप 

देव आईचे स्वरूप 

गुरु आई आई गुरु 

सारे सारे एकरूप 


🙏🙏🙏

जय शंकर 🥰माऊलि🥰


Comments

Popular Posts