माहुत....!!!

 मन हत्ती होय बाबा

त्यात लई रे ताक़त
डाव उलथुणी टाकी
मन एका रे क्षणात

ध्यान नित्य अभ्यासाने
मन राही रे काबूत
त्याले ठेवण्या मूठित
जीवा व्हावे रे माहुत

कसा माहुत सहज
हत्तिले रे बसवितो
मन शांत शांत खोल
सदा कदा हसवितो

आज उधलला हत्ती
आज जीव घाबरला
मनाच्या या गुन्तित रे
जीव हरला हरला

व्हावे लागतें माहुत
मन हत्ती होतों शांत
गुरु माउलीचा हात
त्याले तुझि असो साथ

🙏🙏🙏



Comments

Unknown said…
अप्रतिम

Popular Posts