Monday, January 30, 2017

Human rights आणि ढोंग आणि स्वच्छ भारत अभियान...!

Human rights आणि ढोंग आणि स्वच्छ भारत अभियान...!

तथाकथित 'माणूस' म्हणून घेणाऱ्या ढोंगी लोकांना चित्र बघूनच मळमळायला होत असेल मात्र माणूसपण नेमकं कुणाचं जपायचं, कुणी जपायचं अन कुठपर्यंत जपायचं...!
जेव्हा जेव्हा गटार साफ होत असताना आपलाच एक बांधव गटारात पूर्ण बुडालेला असतो तेव्हा तेव्हा त्याला 'सेफ्टी' म्हणजे काय 'ती' कधीच नसते.
त्याच्या जगण्याच्या अधिकाराची पर्वा करणं तर दूरच, उलट भंपक मानवतेची लक्तरे टांगून मज्जा बघनर्यांची आणि कसलेतरी भाव चेहऱ्यावर आणून नाकाला रुमाल लावणाऱ्यांचीच प्रतिष्ठा धोक्यात येत असते.
त्या स्वच्छ काम करणाऱ्या बांधवांच्या कामाला प्रतिष्ठा तर सोडाच , सहानुभूती सुद्धा नाही.
ते सारे बांधव खरेच ग्रेट आहेत आणि त्यांचं काम सुद्धा...!
आपल्याच मनात गटारं तुंबली आहेत, घाण, घाणेरडी, भंपकपणाची गटारं, खोटारडेपणाची किळसवाणी घाण, अहँपणाची किळस, आणि आणि  घाण ते सारं...!
गटारीत उतरताना त्रास होऊ नये म्हणून अंगाला तेल लावणे आणि गटारीची घिन नाकात बसू नये म्हणून दारू पिणे हे कुठल्या मानवी हक्कात येतं?
माणूस म्हणून जन्माला येणं म्हणजे काय निव्वळ हात, पाय, डोळे आणि कान का?
जगण्याचा अधिकार असा काही नाही का?
विषारी रसायनांनी ते जीवन्त राहत असतील का?
डेटॉल नं हात धुणारे नाही धुतला तर पडतात नं 'लगेच' आजारी तर यांची आणि यांच्यामुळे कुटुंबात पसरणाऱ्या आजाराचं काय?
यांचं जगणं आणि मरणं सुद्धा इतकं स्वस्त का आणि कुणी केलं?
'स्वच्छ भारत अभियान' फक्त झाडू हातात घेऊनच का;
का उतरलं नाही कुणी अजून गटारात 'स्वच्छ भारत अभियान' म्हणून...सेल्फी काढायला?
ढोंगं सोडा, नाटकं बंद करा, आणि माणूस म्हणून घेणाऱ्या हिंसक जनावरांनो...
जरा
या बांधवांच्या  'human rights' चा जरा विचार करा.

आणि 'अच्छे दिन' वाल्यांनी देखील 'माझा भारत खऱ्या अर्थानं स्वच्छ करणाऱ्या' या सर्व शूरांना त्यांच्या जगण्याचा अधिकार द्यावा आणि तो देणे हे तुमच्यावर बंधनकारक आहे.

सफाईकाम करणाऱ्या समस्त बांधवांना समर्पित....
तुम्ही खरंच ग्रेट आहात.

No comments: