Monday, January 9, 2017

नर्व्हस नाईनटी

नर्व्हस नाईनटी

शतकाच्या जवळ आल्यानंतर येणाऱ्या नर्वसनेसला "नर्व्हस नाईनटी"असे म्हणतात.
जगात खूप कमी म्हणजे अगदी दुर्मिळ क्रिकेट प्लेयेर्सला या प्रकारच्या नर्व्हसनेस चा सामना करावा लागला.

बॅडमिंटन एकेरी, टेनिस एकेरी, चेस, आणि तत्सम क्रीडा प्रकारात एकटा प्लेअर लढत असतो आणि देशाचे प्रतिनिधित्व करत असताना विजयाच्या जवळ आल्यावर नर्व्हस वगैरे होताना आपण बघत असतो.

मात्र क्रिकेट हा अकरा जणांची एक टीम असलेला क्रीडा प्रकार असताना संघाच्या विजयाशी येताना येणारा 'नर्व्हसपणा' वयक्तिक शतकाच्या जवळ आल्यावर जेव्हा येतो तेव्हा त्याला कोणत्या व्याख्येत बसवावे ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे 'नर्व्हसनाईनटी'.

अखिल विश्वात 'नर्व्हस नाईनटी' वाले प्लेअर नाममात्र आहेत, मात्र जे आहेत त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावर करत असताना स्वतःचे शतक जवळ आल्यावर कमी होत जाणारा धावांचा वेग आणि त्यातच आऊट होण्याच्या या क्रीडा प्रकाराला विशेष हळहळ प्राप्त करवून दिली आणि आपल्या भारत देशात हि हळहळ जास्तच प्रकट झालेली दिसून आली.

हल्ली भारतीय क्रिकेट मध्ये विराट विराट शतक होत असताना 'नर्व्हसनाईनटी' हा अवगुण मात्र हद्दपार झालेला दिसून येत आहे.आणि हि विशेष आनंदाची गोष्ट आहे.

महेंद्रसिंग धोनी नावाच्या एका विशेष आणि खऱ्या खुऱ्या खेळाडूने देशाला 'जिंकणं' या प्रकाराची सवय लावली आणि अटी तटीच्या सामन्यात सुद्धा आपला एकही खेळाडू आणि पाहणारा दर्शक ' नर्व्हस' होत नाही हे विशेष, उलट सारंच कसं उत्सव उत्सव होऊन जातं.

आता हे वाचल्या नंतर बऱ्याच जणांना नर्व्हस पणा येऊ शकतो आणि ' नर्व्हस नैन्टि' जर सोडलं तर बाकी किती विशेष होतं अशी ओरड सुरु होऊ शकते.
मात्र त्या सर्व ' नर्व्हस नैन्टि' समर्थक आणि भक्त मंडळींना मला एवढेच सांगायचे आहे की आजच्या ' फिरकी विथ महेश' चा विषय 'नर्व्हस नाईनटी' हा असल्या कारणाने केवळ तथ्याच्या आधारावर याचा विचार करावा उगीच आपण किती मोठे भक्त आहोत हे सिद्ध करत बसू नये.

 'नर्व्हस नाईन टी' हि भावना हद्दपार होवो आणि देश नवनवे रेकॉर्ड घडवीत राहो.

वाचत राहा
फिरकी विथ महेश नवले

No comments: