Sunday, January 8, 2017

भीष्मांसारखा इच्छामरणी फक्त धोनी...!

भीष्मांसारखा इच्छामरणी फक्त धोनी...!

MSD थँक्स.
धोनी,
तू नसताना सुद्धा आम्ही क्रिकेट बघायचो, पण जिंकणं आणि फक्त जिंकणं आम्हाला ठाऊकच नव्हतं, मुळात आमची जिंकण्याची खरी व्याख्या फक्त पाकिस्तान विरुद्ध जीवन्त राहत असे, अन्यथा आम्ही कुणाचं शतक झालं की हरखून जायचो आणि त्यातच आम्हाला जिंकल्यासारखं वाटायचं, खेळायला आलेला प्रत्येक जण आम्हाला ड्युटी वर हजर झाल्यासारखा वाटायचा, अकरा जण एक एक करून बळजबरीने टीम या व्याख्येत बसत होते.

आणि खरं सांगू, क्रिकेट मध्ये अकरा प्लेअर मिळून असतात हेच आम्ही विसरून गेलो होतो, आमच्या साठी इंडिया म्हणजे एकाच हाताच्या बोटावर मोजता येईल अशी टीम आणि त्यातही राहुल द्रविड वगळता सारे आपली स्वतःची टीम बनवून  भारत हरला तरी स्वतः जिंकतिल अशी तरतूद करणारे होते.

धोनी तू आलास आणि वीज चमकावी तसं काही चमकून गेलं, हळू हळू चित्र पालटलं, अकराच्या अकरा जणं दिसायला लागले, खेळायला लागले, आणि जिंकायला लागले.
तुझ्यामुळे देश जगज्जेता झाला, यापूर्वी रेकॉर्ड खूप झाले मात्र ते देशाच्या प्लेयेर्सच्या नावावर होते, तू मात्र देशाच्या नावावर रेकॉर्ड जोडले.

धोनी तूच भीष्मासारखा इच्छामरणी आहेस, तुला कुणी निवृत्त हो असं म्हणत नाही की तुला कुणी captaincy सोड असं म्हणत नाही,
तुझे निर्णय हे तुझेच असतात आणि
संपूर्ण भारत देश तुझ्यासोबत आहे.
MSD तूच महान आहेस.