Thursday, November 3, 2016

प्रिय गौरी...!

प्रिय गौरी,
आज तुझा वाढदिवस, तुला खूप खूप प्रेम आणि शुभेच्छा.
या वेळी तुझा वाढदिवस स्पेशल आहे, आणि तुझं गिफ्ट सुद्धा ईश्वरानं तुला ऍडव्हान्स मधेच दिलंय, 'गार्गीच्या' जन्मासोबतच तुझ्या अंतरात , एका ' आईचा' जन्म झालाय. आणि हे 'मातृत्व' म्हणून मिळालेलं गिफ्ट अखिल विश्वातील सर्वांत सुंदर असं गिफ्ट आहे.... या पेक्षा मोठं ते काय...!
येणारं पुढील आयुष्य तुझ्यातील या 'आई' ला संभाळण्यासाठीच आहे....!
'आई' या शब्दाची खरी ताकत काय हे तुला समजलंच आहे मात्र तरी सुद्धा आपल्या बाळाचे संगोपन चांगलं करणं एवढं ते मर्यादीत नसून,  अखिल विश्वाचे संगोपन करणारं बाळ घडवणं एवढं ते विशाल आहे.
'आई' जिजाऊ यांनी शिवाजीसाठी स्वराज्य निर्मान केलं नाही तर स्वराज्यासाठी शिवाजी घडवले होते हे लक्षात ठेव.....आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर असू दे.
'आई' च्या नजरेतून जग बघताना प्रत्येक नात्याला 'बाळ' म्हणून बघावं लागेल, आईला जशी सारी लेकरं सारखी, अगदी तसं...!
आता येणारं आयुष्य हे 'अकल्पनिय' असणार आणि ईश्वराने निर्मिलेल्या रंगमंचावरील त्याची सर्वश्रेष्ठ भूमिका त्यानं तुला दिलीय....'आईची'.....!
वेगवेगळ्या नात्यात राहून संसार करताना ' आई' च्या भूमिकेत जर सतत राहिली कि संसार फक्त सुखाचा आणि सोन्याचा होईल असं नाही तर तो ईश्वरीय होऊन जाईल...!
आणि आपला संसार सोन्याचा आहेच.....!
चल आजपासून दोघे मिळून त्याला ईश्वरीय करूयात....!
आजच्या वाढ दिवशी आपला संसार परमेश्वरी कृपेचे श्रेष्टतम् रूप होवो हीच प्रार्थना...!
तूला
Happy birthday


From
गार्गीचे पप्पा.